Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्पृहाचा अस्सल मराठमोळा लूक

By admin | Updated: August 20, 2016 02:43 IST

स णवार आले की महिलांना सजायची चांगलीच संधी मिळते. खरंतर, सजायची हौस प्रत्येक महिलेलाच असते. मग अशा वेळी आपल्या अभिनेत्री तरी कशा काय मागे राहतील?

स णवार आले की महिलांना सजायची चांगलीच संधी मिळते. खरंतर, सजायची हौस प्रत्येक महिलेलाच असते. मग अशा वेळी आपल्या अभिनेत्री तरी कशा काय मागे राहतील? सध्या श्रावण महिना सुरू असून, सणांची लगबग आहे. एका सणासाठी स्पृहा जोशीदेखील मस्त पारंपरिक वेशात सजली होती. तिने नुकताच सोशल मीडियावर अस्सल मराठमोळ्या अंदाजातील एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये स्पृहा फारच छान दिसत आहे. लाल रंगाची भरजरी साडी, कपाळावर चंद्रकोर, कानात झुमके, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मोत्यांच्या माळा, बाजुबंद अशा पेहरावामध्ये काढलेला तिचा हा फोटो अप्रतिम आहे. या फोटोबद्दल बोलताना स्पृहा सांगते, ‘मला पारंपरिक कपडे घालायला खूप आवडतात. सध्या सणांचे वातावरण असल्याने मीदेखील पारंपरिक कपडे परिधान केले होते.’