Join us

विराट अनुष्कामुळे अडचणीत ?

By admin | Updated: May 20, 2015 00:13 IST

आयपीएलमधील बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाचा कर्णधार विराट कोहली एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा चर्चेत आला आहे.

आयपीएलमधील बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाचा कर्णधार विराट कोहली एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा चर्चेत आला आहे. रॉयल चॅलेंजर्सचा संघ रविवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध बंगळुरूमध्ये आपला शेवटचा लीग सामना खेळत होता. दिल्लीची फलंदाजी संपल्यानंतर विराट कोहली डग आऊटजवळच्या व्हीआयपी एरियात गेला आणि अनुष्का त्याने शर्माला खुणा करून बोलावले. ती कोहलीजवळ आली. दोघेही पाच मिनिटं बोलले आणि नंतर अनुष्का परतली. या दरम्यान दिल्ली डेअरडेव्हिल्सचा खेळाडू युवराज सिंगही उपस्थित होता. आयपीएलच्या नियमानुसार सामना सुरू असताना कोणताही खेळाडू संघ सहकाऱ्यांशिवाय इतरांशी बोलू शकत नाही.