Pranit Hatte: सध्या लग्न सराई सुरू आहे. सर्वसामान्य व्यक्तींसोबतच अनेक सेलिब्रिटी मंडळी देखील विवाह बंधनात अडकताना पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे यांच्यानंतर आणखी एका मराठी सेलिब्रेटीनं लग्न केलं आहे. काल शनिवारी १ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर तृतीयपंथी मराठी अभिनेत्री प्रणित हाटेने (Pranit Hatte Wedding) लग्नगाठ बांधली.
प्रणित हाटेने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. "गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एक नवीन सुरुवात...", असं कॅप्शन देत प्रणितने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रणितने लग्नात पारंपारिक मराठी लूक केलेला पाहायला मिळाला. लाल रंगाची साडी, हिरव्या रंगाचा चुडा असा लूक होता. तर पतीनं पांढरा कुर्ता-पायजामा व लाल जॅकेट असा पोशाख परिधान केलेला.