Join us

'टॉयलेट एक प्रेमकथा' चित्रपट 'या' तारखेला होणार प्रदर्शित

By admin | Updated: November 14, 2016 17:34 IST

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'टॉयलेट एक प्रेमकथा' हा चित्रपट येत्या 2 जून 2017 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'टॉयलेट एक प्रेमकथा' हा चित्रपट येत्या 2 जून 2017 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 
 'टॉयलेट एक प्रेमकथा'  या चित्रपटाच्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली असून, या ट्विटला अभिनेत्री भूमी पेडणेकर हिनेही रिट्विट केलं आहे. यामध्ये  'टॉयलेट एक प्रेमकथा' हा चित्रपट येत्या 2 जून 2017 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नारायण सिंह यांनी केलं असून हा चित्रपट उपहासात्मक आणि प्रेमकथा यावर आधारित आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती अरुण भाटिया, प्लान सी स्टुडिओ आणि अबुदांतिया करत आहेत. 
'दम लगा के हईशा' या चित्रपटानंतर अभिनेत्री भूमी पेडणेकर पहिल्यांदाच अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत  'टॉयलेट एक प्रेमकथा' या चित्रपटात दिसणार आहे.