Join us
Daily Top 2Weekly Top 5

आज प्रसिद्ध गीतकार शंकरदास केसरीलाल यांची जयंती

By admin | Updated: August 30, 2016 10:01 IST

मुड मुड के ना देख मुड मुड के,पिया तोसे नैना लागे रे,दिल की नज़र से, अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहा खतम, अशी अनेक संस्मरणीय गाणी मा.शैलेंद्र यांनी आपल्याला दिली.

संजीव वेलणकर 

पुणे, दि. ३० - शंकरदास केसरीलाल हे शैलेंद्र यांचे मूळ नाव. आवारा हूँ, रमैया वस्ता वैया, दिल के झरोखे में तुझको बिठा कर,मुड मुड के ना देख मुड मुड के,पिया तोसे नैना लागे रे,दिल की नज़र से, अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहा खतम, अशी अनेक संस्मरणीय गाणी मा.शैलेंद्र यांनी आपल्याला दिली. १९४७ साली  एका कार्यक्रमात काव्यवाचनाचे त्यांना निमंत्रण आले. तेथे त्यांनी ‘जलता है पंजाब’ ही कविता सादर केली. त्या कार्यक्रमाला राज कपूर उपस्थित होते. 
 
त्यांनी शैलेंद्र यांची कविता ऐकली आणि ते भारावले. त्यांनी शैलेंद्र यांना गाठले. तेव्हा राज कपूर ‘आग’ बनवत होते. ‘आग’साठी गीतलेखनाचा प्रस्ताव त्यांनी शैलेंद्र यांच्या समोर ठेवला; शैलेंद्र यांनी तो नाकारला. नंतर पुलाखालून बरेच पाणी गेले. शैलेंद्रचे दोनाचे चार हात झाले. संसाराचा गाडा नीट हाकण्यासाठी पैशांची वानवा जाणवू लागली. एकेदिवशी त्याने सरळ आरके स्टुडिओ गाठला.
 
आरके कॅम्पमध्ये तेव्हा ‘बरसात’चे काम सुरू होते. राज कपूरने या अनोख्या शैलीच्या गीतकाराला ‘बरसात’च्या गीतलेखनाची संधी दिली. शैलेंद्रने ‘बरसात मे हमसे मिले तुम...’ आणि ‘पतली कमर है, तिरछी नजर है’ ही दोन गाणी लिहिली. तेव्हा पासून राज कपूर यांच्या सर्व चित्रपटात मा.शैलेंद्र यांनी गाणी लिहिली. शैलेंद्रच्या गाण्याने ‘आर.के’ला एक नवी ओळख दिली. 
 
केवळ राज कपूरचा गीतकार ही ओळख पुसणारा म्हणून ‘गाइड’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘गाइड’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील माइलस्टोन. यात शैलेंद्र यांच्या गाण्यांचा वाटा निश्चितच सर्वात मोठा. ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’, ‘गाता रहे मेरा दिल’, ‘मोसे छल किये जा’, ‘वहाँ कौन है तेरा’ असे गानमोती या ‘गाइड’च्या माळेत शैलेंद्रने गुंफले आहेत. ‘काँटो से खीच के ए आँचल’ हा त्यातील मुकुटमणी ठरावा. १९५८ मध्ये 'ये मेरा दीवानापन है...' (फ़िल्म- यहूदी) च्या साठी १९५९ मध्ये 'सब कुछ सीखा हमने...' (फ़िल्म- अनाडी) १९६८ साली 'मै गाऊं तुम सो जाओ...' (फ़िल्म- ब्रह्मचारी) सर्वश्रेष्ठ गीतकार म्हणून मा.शैलेंद्र फ़िल्मफ़ेयर पुरस्कार मिळाला होता. 
 
खूप कमी लोकानां माहित असेल की राज कपूर यांनी अभिनय केलेला 'तीसरी कसम' 'हा चित्रपट या शैलेंद्र निर्मित होता. पण हा चित्रपट चालला नाही. १९६६ मध्ये ‘जाने कहां गए वो दिन, कहते थे तेरी याद में, नजरों को हम बिछायेंगे’ गाणे लिहित असताना ते आजारी पडले रुग्णालयात असताना त्यांनी. राज कपूर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना आर. के. स्टुडिओ मध्ये भेटायला नेत असताना १४ डिसेंबर १९६६ रोजी निधन झाले.