Join us

शाल्मली गाणार मालिकेचे शीर्षकगीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 03:49 IST

इश्कजादे या चित्रपटातील मैं परेशान या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली गायिका शाल्मली खोलगडे आता एका मराठी मालिकेचे शीर्षकगीत गाणार

इश्कजादे या चित्रपटातील मैं परेशान या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली गायिका शाल्मली खोलगडे आता एका मराठी मालिकेचे शीर्षकगीत गाणार आहे. चाहूल या मालिकेचे शीर्षकगीत तिच्या आवाजात नुकतेच रेकॉर्ड करण्यात आले. कोणत्याही मराठी मालिकेचे शीर्षकगीत तिने गाण्याची ही पहिलीच वेळ आहे. शाल्मली ही मराठी असल्याने तिने एखाद्या मराठी मालिकेचे शीर्षकगीत गावे अशी तिच्या आईवडिलांची कित्येक दिवसांपासूनची इच्छा होती. ही इच्छा या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण झाली असल्याचे कळतेय.