Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ चिमुकल्या स्टारकिडने आईसाठी बनवला हॅण्डमेड नेकलेस; डिझाईन पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 17:08 IST

याने त्याच्या आईसाठी पास्तापासून एक कलरफुल नेकलेस बनवला आहे. त्याची डिझाईन पाहून कोणालाही ते गळयात घालण्याचा मोह होईल यात काही शंकाच नाही.

सध्या सर्वत्र सेलिब्रिटीही आपापल्या घरी लॉकडाऊन झाले आहेत. आपल्या कुटुंबासोबत ते वेळ घालवत असून त्यांच्या हॉबींवर काम देखील करत आहेत. बॉलिवूडच्या पतौडी घराण्याची सून बेगम करिना कपूर खान ही देखील तिच्या कुटुंंबासोबत विविध अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये रममाण झाली आहे. नुकताच तिचा मुलगा तैमूर अली खान याने  आई करिनासाठी पास्ता पासून एक सुंदर नेकलेस बनवला आहे. तुम्ही डिझाईन पाहाल तर त्याच्या प्रेमातच पडाल...

कोणत्याही आईसाठी तिच्या मुलाने बनवलेली प्रत्येक छोटी गोष्ट ही तितकीच महत्त्वाची असते. आता तसेच काही बेगम बेबोसोबतही घडले आहे. तिचा मुलगा छोटा तैमूर अली खान याने त्याच्या आईसाठी पास्तापासून एक कलरफुल नेकलेस बनवला आहे. त्याची डिझाईन पाहून कोणालाही ते गळयात घालण्याचा मोह होईल यात काही शंकाच नाही. तिने हा नेकलेस घालून इन्स्टाग्रामवर त्याचा फोटो शेअर केला आहे. तिच्या चाहत्यांसोबत ती हा आनंद साजरा करू इच्छिते. छोटयाशा तैमूरने किती सुंदर नेकलेस बनवला आहे...या फोटोला अनेक लाईक्सही मिळत आहेत. तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे, ‘पास्ता ला विस्ता’ त्याने बनवलेली ही हॅण्डमेड ज्वेलरीची किंमत ही पैशांमध्ये मोजता येण्यासारखी नक्कीच नाही. 

करिना कपूर खानने अलीकडेच इन्स्टाग्रामवर डेब्यू केला आहे. ती अगोदर सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह नव्हती. मात्र, आता ती चांगलीच अ‍ॅक्टिव्ह झालेली दिसतेय. तिच्या पोस्टना चाहत्यांचाही प्रतिसाद मिळतो आहे. ती अधून मधून कुटुंबासोबतचे फोटो पोस्ट करत असते. 

टॅग्स :तैमुरकरिना कपूर