Join us

टायगर के साथ शेर

By admin | Updated: July 14, 2016 01:10 IST

सध्या सर्व जण पावसाचा आनंद लुटत आहेत. तसेच मराठी कलाकारदेखील पावसाचा आनंद लुटताना वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत

सध्या सर्व जण पावसाचा आनंद लुटत आहेत. तसेच मराठी कलाकारदेखील पावसाचा आनंद लुटताना वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत; पण आपल्या इमेजला सूट होईन असेच काही तरी संग्राम साळवी या अभिनेत्याने केले आहे. या अभिनेत्याने चक्क ऐन पावसाळ्यात बोरिवली नॅशनल पार्कला भेट दिली. तसेच, त्याने नुसतीच भेटच नाही दिली, तर चक्क वाघासोबत एक झक्कास सेल्फीदेखील काढला आहे. याबाबत लोकमत सीएनएक्सशी बोलताना संग्राम साळवी म्हणाला, ‘‘जग खूप सुंदर आहे. त्याला तसेच सुंदर राहू दे. तसेच जगाची जी सायकल आहे त्याचे संतुलन खराब करून ते कमी करू नका. जर वाघांची संख्या कमी झाली, तर आपल्याला वाघ फक्त चित्रातच पाहायला मिळेल. त्याचबरोबर, वाघ पिंजऱ्यात आहे त्याचे वाईटदेखील वाटत असल्याचे संग्रमाने सांगितले; पण या वाघाने म्हणजेच कृष्णाने खरेच माझ्यासोबत खूप भारीच सेल्फी दिला आहे.’’ असो. पण, संग्रामच्या या रुबाबदार भूमिकेला साजेसे काम करीत त्याचा हा सेल्फी नक्कीच चाहत्यांच्या पसंतीस उतरेल. तसेच, त्याच्या या इमेजला पाहता ‘टायगर के साथ शेर’ असे म्हणायलाही काही हरकत नाही.