टायगर श्रॉफ चा जन्म झाला होता, तेव्हाच सुभाष घई यांनी थोडी रक्कम देऊन त्याला हीरो म्हणून साईन केले होते; पण ‘कांची’मध्ये बिझी असल्याने ते टायगरसोबत पहिला चित्रपट करू शकले नाहीत. ‘हिरोपंती’च्या रूपात टायगरचा पहिला चित्रपट हिट ठरला, त्यामुळे आता घर्इंनाही त्याच्यासोबत चित्रपट करायची इच्छा आहे. सुभाष घई यांनाही गेल्या अनेक वर्षांपासून एका हिटची आवश्यकता आहे. तो हिट चित्रपट ते टायगरच्या सहाऱ्याने बनवू इच्छितात. लवकरच ते टायगरसोबत एक चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटात रोमान्स आणि अॅक्शन पाहायला मिळेल.
टायगर श्रॉफला घेऊन चित्रपट बनवणार घई
By admin | Updated: July 2, 2014 09:09 IST