Join us

ज्ॉकलीनसोबत टायगरची जोडी

By admin | Updated: November 13, 2014 00:02 IST

सलमान खानसोबत ‘किक’ या सुपरहिट चित्रपटात काम करणारी ज्ॉकलीन फर्नाडिस लवकरच नवोदित अभिनेता टायगर श्रॉफसोबत अभिनय करताना दिसणार आहे.

सलमान खानसोबत ‘किक’ या सुपरहिट चित्रपटात काम करणारी ज्ॉकलीन फर्नाडिस लवकरच नवोदित अभिनेता टायगर श्रॉफसोबत अभिनय करताना दिसणार आहे. कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसुजा यांच्या आगामी चित्रपटासाठी या जोडीची निवड करण्यात आली आहे. चित्रपटात ज्ॉकलीन भरतनाटय़म करताना दिसणार आहे. सध्या एका आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असलेली ज्ॉकलीन लवकरच भरतनाटय़मचे प्रशिक्षणही घेणार आहे. चित्रपटातील भूमिकेबाबत सांगायला ज्ॉकलीन तयार नाही; पण टायगरसोबत काम करण्याबाबत खूप उत्सुक असल्याचे ती सांगते. टायगरसोबत तिची जोडी धम्माल करेल, असे तिला वाटते.