Join us

अशाप्रकारे सोनाली कुलकर्णीने दिला होता भावी पतीला ‘होकार’; तिने शेअर केली ‘ती’ गोड आठवण!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 18:50 IST

सोशल मीडियावरही सोनालीचे लाखो चाहते आहेत. तिच्या विविध फॅशन फोटोंना सोशल मीडियावर हजारो लाईक्स मिळतात. २ फेब्रुवारी रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत आपल्या परिवारातील सदस्यांसोबत त्यांचा साखरपुडा हा सोहळा पार पडला.

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ म्हणजेच आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णी. तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अदांनी तिने आत्तापर्यंत चाहत्यांना घायाळ केले आहेच. सोशल मीडियावरही सोनालीचे लाखो चाहते आहेत. तिच्या विविध फॅशन फोटोंना सोशल मीडियावर हजारो लाईक्स मिळतात. २ फेब्रुवारी रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत आपल्या परिवारातील सदस्यांसोबत त्यांचा साखरपुडा हा सोहळा पार पडला. सोनालीने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरुन हे सरप्राईज दिलं होतं. तुम्हाला माहित आहे का, कुणालने तिला कशाप्रकारे प्रपोज केले होते ते...नाही ना. मग तिची पोस्ट बघा तुम्हाला ते कळेलच.

 https://www.facebook.com/sonalee1/posts/1478591255665835

कुठल्याही मुलीचे स्वप्न असते की, तिच्या होणाऱ्या  पतीने तिला प्रपोज करावं. तिला रोमँटिक अंदाजात गिफ्टस देऊन प्रपोज करावं असं स्वप्न असतं. तसंच काहीसं स्वप्न आपल्या लाडक्या सोनालीचंही होतं. आज सोनालीच्या साखरपुड्याला सहा महिने पूर्ण होत आहेत. या निमीत्ताने सोनालीने आपल्या होणाऱ्या पतीने आपल्याला कसं प्रपोज केलं याबद्दलची एक गोड आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे. सोनालीच्या या फोटोलाही सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून सोनाली ही दुबईमध्येच आहे. या काळात कुणालसोबत किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवताना, किंवा दुबईतील स्थानिक हॉटेलमध्ये भेट देतानाचे अनेक व्हिडीओ सोनाली सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला कायम चाहत्यांच्या संपर्कात राहायला प्रचंड आवडतं. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीमराठीदुबई