मुंबई : सध्या मॉडल-अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेन्ड अंकिता कोवर यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. इकतंच काय तर मिलिंद सोमण हा त्याच्याहून 25 वर्षांनी लहान असलेल्या अंकितासोबत लग्नही करणार असल्याची चर्चाही जोरात आहे. पण याबाबात त्यांनी काहीही अधिकृत सांगितलेलं नाहीये. या दोघांच्या वयाच्या अंतराबाबत खासकरुन चर्चा होत आहे. अशात मिलिंद सोमणच्या आधीच्या अफेअरबद्दलही गॉसिप्स सुरु आहेत. चला आपणही जाणून घेऊया त्याच्या याआधी गाजलेल्या अफेअर्सबद्दल आणि त्याच्या गर्लफ्रेन्डबद्दल....
1) मधु सप्रे
मिलिंद सोमणची पहिली गर्लफ्रेन्ड ही मराठमोळी मॉडेल मधु सप्रे ही होती. 1992 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर मधु भारतात आणि फॅशन विश्वात दमदार करिअर सुरु केलं. 90 च्या दशकात मिलिंद आणि मधु सप्रेचं नातं चांगलंच गाजलं. या दोघांनी एकत्र केलेली न्यूड जाहीरातही फार वादग्रस्त ठरली होती. या दोघांनी ते एकत्र राहत असल्याचीही कबूली दिली होती. त्यावेळी या दोघांची जोडी फारच लोकप्रिय ठरली होती. 1995 मध्ये दोघे वेगळे झाले.
2) मायलेन जम्पनॉई
ही गोष्ट फारच कमी लोकांना माहिती आहे की, मिलिंद सोमण याने लग्नही केले होते. मिलिंद सोमण हा मायलेन जम्पनॉई या फ्रेन्च अभिनेत्रीला व्हॅली ऑफ फ्लॉवर या सिनेमावेळी भेटला होता. जुलै 2006 मध्ये दोघांनी गोव्यात लग्न केले. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. दोघांनी 2008 वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा 2009 मध्ये घटस्फोट झाला.
3) शाहना गोस्वामी
मिलिंद आणि शाहना हे एकत्र एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर दिसले होते. त्यानंतर 2010 मध्ये ही जोदी त्यांच्या अफेअरमुळे चांगलीच चर्चेत होती. दोघांमध्ये 21 वर्षांचं अंतर होतं. त्यामुळे त्यांचं अफेअर जास्त गाजलं. मायलेनसोबत घटस्फोट झाल्यानंतर हे त्याचं पहिलं कन्फर्म अफेअर होतं. चार वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघे 2013 मध्ये वेगळे झाले.
4) दीपनिता शर्मा
2002 साली मिलिंद आणि अभिनेत्री दीपनिता शर्मा यांच्यात काहीतरी असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या दोघांनी 16 डिसेंबर आणि जोडी ब्रेकर्स या दोन सिनेमात काम केलं होतं. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, दोघांनी या काळात बिपाशा बसूसोबत फ्लॅट शेअर केला होता.
5) गुल पनाग
अभिनेत्री गुल पनाग आणि मिलिंद हे दोघे 2005 मध्ये एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. हे दोघे 2005 मध्ये जुर्म या सिनेमावेळी जवळ आले होते. त्यानंतर अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये दोघे सोबत होते. पण त्यांनी कधीही आपल्या या नात्याबाबत जाहीर कबूली दिली नाही.
6) बिपाशा बसू
मिलिंद सोमण आणि बिपाशा बसू यांच्या अफेअरच्याही जोरदार चर्चा होत्या. पण याबाबत अधिकृतपणे त्यांनी काहीही सांगितलं नाही. पण बिपाशा फॅशन विश्वात नेमकीच आली होती आणि मिलिंद सोमण हा आधीच सुपरमॉडल होता, त्यावेळी ही चर्चा रंगली होती.