बॉलीवूड असो वा मराठी चित्रपट; सलमान, शाहरुख व आमीर या तीन खान्सना एकत्रित चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षकांची नेहमीच चर्चा असते. त्याचप्रमाणेच, मराठी चित्रपटातदेखील इंडस्ट्रीतील तीन दिग्गजांना एकत्रित पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच प्रतीक्षेत असतात. रसिक मायबापांचा हा उत्साह पाहता, आता महेश मांजरेकर, अशोक सराफ व शरद पोंक्षे हे तीन दिग्गज कलाकार दिग्दर्शक टीएलव्ही प्रसाद दिग्दर्शित ‘वृंदावन’ या सिनेमात पाहायला मिळणार आहेत, तर राकेश बापट, पूजा सावंत, वैदेही परसुरामी हे कलाकार वृंदावनमध्ये मुख्य भूमिकांत पाहायला मिळतील. या व्यतिरिक्त भारत गणेशपुरे, मोहन जोशी, आरती सोळंकी, उदय टिकेकर या कलाकारांचादेखील या चित्रपटात समावेश आहे.
मराठी चित्रपटातील तीन दिग्गज एकत्र
By admin | Updated: March 3, 2016 02:32 IST