सोनी एण्टरटेनमेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) सीझन १६मध्ये इंडिया चॅलेंजर वीकद्वारे आता रोमांचक ट्विस्ट आला आहे. दिल्लीची प्रियंका ही इंडिया चॅलेंजर वीकमधील स्टँडआऊट स्पर्धक यापैकीच एक आहे. हॉटसीटवर असताना प्रियंकाने अचानकपणे मस्त ट्विस्ट आणला. तिने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना अत्यंत खुमासदार आणि स्पष्ट प्रश्न विचारले.
प्रियंकाने अमिताभ बच्चन यांना विचारले की, "तुमचं घर एवढं मोठं आहे, रिमोट हरवलं तर ते कसं शोधता." त्यावर बिग बी म्हणाले, "मी थेट सेट टॉप बॉक्सजवळ जाऊन त्याद्वारे कंट्रोल करतो.." ढच्या संवादात प्रियंकाने मध्यम वर्गीय कुटुंबासंबंधी आणखी प्रश्न विचारले. या प्रश्नांमुळे प्रश्नमंजुषेच्या या कार्यक्रमात हास्यकल्लोळ उडाला. प्रियंकाने विचारले, "सर, मध्यमवर्गीय कुटुंबात रिमोट हरवलं तर भांडणं होतात. तुमच्याकडेही असं होतं का?".. अमिताभ बच्चन म्हणाले, "नही देवी जी... हमारे घर में ऐसा नही होता.. सोफें पर दोन तकिये होते है.. रिमोट उस में छुप जाता है.. बस वहीं ढुंढना पडता है.."
जया बच्चन यांच्याबद्दल बिग बी म्हणाले...प्रियंकाने पुढचा प्रश्न विचारला, "मी ऑफिसमधून घरी जाते तेव्हा मम्मी सांगते, येताना कोथिंबीर आण.. जया मॅडम तुम्हालाही असं काही आणायला सांगतात का? " अमिताभ बच्चन म्हणाले, " हो सांगतात ना.. तुम्ही स्वत:ला घरी आणा.." प्रियंकाने शेवटचा प्रश्न विचारला, "सर, एटीएममधून कॅश काढायची असताना तुम्ही कधी बॅलेन्स चेक केलंय का?" अमिताभ बच्चन यांनी तात्काळ उत्तर दिलं, "मी माझ्याकडे कॅश बाळगतच नाही.. आणि मी कधी एटीएममध्येही गेलो नाही. ते कसं वापरतात, हे मला कळत नाही. पण जयाजींकडे कॅश असते. मी त्यांच्याकडे पैसे मागतो. जयाजींना गजरा खूप आवडतो. तर रस्त्यात मी लहान मुलाकडून गजरा विकत घेतो. तो गजरा कधी जयाजींना देतो तर कधी गाडीतच ठेवतो. कारण त्याचा सुगंध मला खूप आवडतो.. "