Join us  

What ! 'माझी तुझी रेशमगाठ' मालिकेतून हा अभिनेता पडला बाहेर, आता या अभिनेत्याची होणार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 5:14 PM

परीने यशचा वडील म्हणून स्वीकार करावा यासाठी नेहा आणि यश प्रयत्न करत आहे.मात्र, यामध्येच आता अचानकपणे एका अभिनेत्याने मालिका सोडल्याचं समोर येत आहे.

छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. नेहा आणि यश यांच्या मैत्रीचं रुपांतर आता प्रेमात झालं आहे. त्यामुळे ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. यामध्येच परीने यशचा वडील म्हणून स्वीकार करावा यासाठी नेहा आणि यश प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर यश खास परीच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे.  त्यामुळे ही मालिका रंजक वळणावर आहे. मात्र, यामध्येच आता अचानकपणे एका अभिनेत्याने मालिका सोडल्याचं समोर येत आहे.

या मालिकेतील नेहा, शेफाली, बंडू काकू, परी आणि अशा अनेक स्त्री भूमिका गाजत आहेत. मात्र, या सगळ्यांपैकीच एका अभिनेत्याने मालिका सोडली आहे.  ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून यशचे आजोबा आहेत.जग्गू आजोबांनी ही सिरिअल सोडल्याचं समजतंय. यशच्या आजोबांची भूमिका साकारत असलेल्या ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींनी ही मालिका सोडल्याचं वृत्त आहे. त्यांच्या जागी आता मालिकेत ज्येष्ठे अभिनेते प्रदीप वेलवणकर यांची एंट्री होणार आहे. तब्येतीच्या कारणामुळे मोहन जोशीनी ही मालिका सोडली असल्याचे कळतंय. 

दरम्यान मालिकेत यश एक संपूर्ण दिवस परीसोबत घालवतो. मात्र, त्यांच्या नजरचुकीमुळे परीचा लहानसा अपघात होतो. मात्र, या अपघातामुळे परीला चांगलाच मार लागतो. परिणामी, संतापलेल्या नेहाने यशला परी जवळ परवानगीशिवाय न जाण्याचा सल्ला दिला आहे. 

टॅग्स :मोहन जोशीटिव्ही कलाकारझी मराठी