Join us

"एवढे मोठेपणाच्या नावाखाली जगतात आणि...", सयाजी शिंदेंनी आनंदी राहण्यासाठी दिला हा मोलाचा सल्ला

By तेजल गावडे. | Updated: March 19, 2025 19:51 IST

Sayaji Shinde : सयाजी शिंदे यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यात त्यांनी त्यांच्या चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी आपल्या सकस कलाकृतींनी आणि अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी, साऊथ सिनेइंडस्ट्रीतही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सयाजी शिंदे यांचे फॅन्स फक्त भारतात नाही तर जगभरात आहेत. दरम्यान नुकतेच सयाजी शिंदे यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यात त्यांनी त्यांच्या चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

सयाजी शिंदे यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात म्हटले की, स्टेटस काय आहे..स्टेटस आपल्या मनाचा खेळ ठरवला "या झोपडीत माझ्या राजा सजे महाली" ते ज्यांनी कोणी ओळ लिहिली असं बघितलं ना तुम्ही. आहात तिथं जर तुम्ही राजासारखेच असाल तर तुम्हाला कोण विचारतंय. तुमच्या मनाचा काय खेळ चाललाय ते नाहीतर किती बघतो आपण की एवढे कर्ज करतात आणि सुसाईड करतात एवढे मोठेपणाच्या नावाखाली जगतात आणि त्यांची वाट लागते काहीतरी मनाचे खेळ आहेत सगळे आनंदी राहायला मन शुद्ध लागतं बस्स.

वर्कफ्रंटसयाजी शिंदे यांनी १९९५ साली अबोली या चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केले. त्यांनी बऱ्याच मराठी नाटकात काम केले आहे. त्यापैकी सखाराम बाईंडर यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. झुल्वा, वन रूम किचन आणि आमच्या या घरात ही नाटके त्यांची गाजली. त्यानंतर त्यांनी बर्‍याच मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

त्यापैकी गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटात कृषिमंत्री म्हणून त्यांची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली. त्यांनी बऱ्याच हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे.

टॅग्स :सयाजी शिंदे