मीनाक्षी कुलकर्णी, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या डुप्लिकेटचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. हुबेहुब प्रियांकासारख्या दिसणा-या या तरुणीचे नाव आहे नवप्रीत बांगा.. या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींचे लुक-अ-लाइक्स
प्रियांका चोप्रा आणि नवप्रीतच्या चेह-यात इतकं साम्य आहे की इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेले हे फोटो पाहून प्रियांकाची आईही फसली. 21 वर्षीय नवप्रीत मुळची व्हँक्युअरची असून तिचे प्रियांकाशी असलेले साधर्म्य पाहून सगळेच अवाक होतात.
हा फोटो आहे बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याचा डुप्लिकेट सुमेर पसरिचा याचा..
सुमेरची शरीरयष्टी, चेहे-याची ठेवण ही हुबेहुब शाहरूख सारखी असून इन्स्टाग्रामवर या प्रती शाहरूखचेही अनेक फॅन आहेत.
बॉलिवूडचा हँडसम हंक आणि मॅचो मॅन जॉन अब्राहम आणि त्याचा डुप्लिकेट मुबाशिर मलिक...ब्रिटीश ब्रॉडकास्टर व लेखक असलेल्या मुबाशिरचे लुक्स सेम जॉनप्रमाणेच असून त्याच्या गालावरही तेवढीच मोहक खळी पडते.
बॉलिवूडचा सध्याचा सुपरस्टार अभिनेता, रणबीर कपूर याचाही एक डुप्लिकेट असून तो मूळचा काश्मीरचा आहे.
जुनैद शहा असे रणबीरच्या डुप्लिकेटचे नाव असून त्याच्या मित्रांनीच त्याला रणबीर व त्याच्यात असलेले साधर्म्य लक्षात आणून दिले होते. सध्या मॅनेजमेंट कोर्स करणा-या जुनेदला शिक्षणानंतर मॉडेलिंग करण्यात रस आहे.
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याच्यासारखा डिट्टो दिसणारा तरूण म्हणजे नजीम खान... सलमान व नजीममधील साधर्म्य पाहून अनेक जण अवाक होतात. नजीमने सलमानच्याच 'बजरंगी भाईजान' चित्रपटातही भूमिका केली होती.
फक्त बॉलिवूड अॅक्टर्स नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांचा लाडका गायक शान याचाही एक डुप्लिकेट असून त्याचे नाव आहे विजय प्रकाश. त्याची स्माईलही शानच्या स्माईलइतकीच गोड आहे, हे या फोटवरून लक्षात येत असेलंच.