Join us
Daily Top 2Weekly Top 5

या अभिनेत्रींनी सौंदर्याने नव्हे, तर अभिनयाने केले स्वत:ला सिद्ध

By admin | Updated: June 2, 2016 01:01 IST

बॉलीवूड या मायानगरीत नशीब आजमावणाऱ्यांची संख्या तशी कमी नाही. सौंदर्यं, पैसा, गॉडफादर ही त्रिसूत्री मिळाली, तरी बरेचसे तरुण-तरुणी एका टेकच्या प्रतीक्षेत असतातच.

बॉलीवूड या मायानगरीत नशीब आजमावणाऱ्यांची संख्या तशी कमी नाही. सौंदर्यं, पैसा, गॉडफादर ही त्रिसूत्री मिळाली, तरी बरेचसे तरुण-तरुणी एका टेकच्या प्रतीक्षेत असतातच. मात्र, जर तुमच्यात अभिनयाचे टॅलेंट नसेल तर तुमचे सौंदर्यं अथवा पैशाला बॉलीवूडमध्ये शून्य किंमत आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. कारण डस्की लूक असलेल्या कित्येक अभिनेत्रींनी निव्वळ अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. त्यामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील, काजोल, बिपाशा बसू, लारा दत्ता, मलाईका अरोरा, कोकणा सेन, फ्रिडा पिंटो, राधिका आपटे यांच्या नावांचा उल्लेख करता येईल. नुकताच रिलीज झालेल्या ‘फोबिया’ या चित्रपटात राधिकाने केलेल्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. राधिकाने मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. अशाच काही डस्की ब्युटींचा हा आढावा...

कोंकणा सेन-शर्माबंगाली ब्यूटी कोंकणा सेन-शर्मा या अभिनेत्रीचे नाव देखील यशस्वी अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये आहे. तिच्या ‘पेज-३’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळाली. आतापर्यंत तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. तिच्या ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अय्यर’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शविली.

मलाईका अरोराआयटम नंबरसाठी प्रसिद्ध असलेल्या मलाईका अरोराचा देखील डस्की लूक आहे. असे असतानाही तिने कित्येक चित्रपटांमध्ये हिट आयटम नंबर केलेले आहेत. ‘हे बेबी, ओम शांती ओम, काल, मॉँ तुझे सलाम, काटे, इंडियन, दिल से, वेलकम’ या चित्रपटातील तिचे आयटम सॉँग विशेष गाजले आहेत. तसेच तिने बऱ्याचशा चित्रपटांमध्ये देखील यशस्वी भूमिका साकारल्या आहेत.

फ्रिडा पिंटो‘स्लमडॉग मिलेयनियर’ या चित्रपटातून घराघरात पोहचलेली फ्रिडा पिंटो ही अभिनेत्री सध्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहे. या चित्रपटासाठी तिला सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला आहे. सध्या फ्रिडा हॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहे. ‘यू विल मीट अ टोल डार्क स्ट्रेंजर, मिरल, राइज आॅफ प्लॅनेट आॅफ द अ‍ॅप्स, तृष्णा, ब्लॅक गोल्ड, इन्मोर्टल्स, डेजर्ट डांसर, नाइट आॅफ कप्स’ आदी चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

बिपाशा बसूब्लॅक ब्यूटी नावाने प्रसिद्ध असलेल्या बिपाशा बसू हिने करिअरच्या सुरुवातीला अनेक हिट चित्रपट देवून इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान पक्के केले. ‘अजनबी’ या चित्रपटातून डेब्यू केलेल्या बिपाशाने एकेकाळी बॉलिवूडमध्ये अक्षरश: धमाका केला होता. बिपाशाच्या ‘राज’ या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वानीच कौतुक केले होते. तिने चित्रपटात दिलेले इंटिमेट सिन्स चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतरही बिपाशाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

लारा दत्ताडस्की लूक असतानादेखील लारा दत्ता हिने मॉडलिंग जगतातील अतिशय प्रतिष्ठीत समजला जाणारा ‘ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेल’ हा अवॉर्ड पटकाविला. त्यानंतर ‘फेमिना मिस इंडिया आणि मिस युनिव्हर्स’ या अवॉर्डवर देखील तिने स्वत:चे नाव कोरले. बॉलिवूडमध्ये लाराचे करिअर डगमगले असले तरी सुरुवातीच्या काळात तिने बरेचसे हिट चित्रपट दिले. २००३ मध्ये आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटातून तिने करिअरला सुरुवात केली. या चित्रपटासाठी तिला पहिला फिल्म फेअर अवॉर्ड देखील मिळाला.

काजोल एकेकाळी टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान असलेल्या काजोलची विशेष ओळख आहे. ‘बेखुदी’ या चित्रपटातून डेब्यू केलेल्या काजोलला या चित्रपटातून फारसे यश मिळाले नाही. मात्र त्यानंतर आलेल्या ‘बाजीगर’ या चित्रपटाने काजोलला स्टारचा दर्जा मिळवून दिला. पुढे काजोलने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. तिचा ‘दिलवाले’ हा चित्रपट विशेष गाजला.