Join us

विवेकसोबत कोणताही चित्रपट नाही

By admin | Updated: November 21, 2014 00:11 IST

तमन्ना भाटिया आणि विवेक ओबेरॉय एका चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची चर्चा हो

तमन्ना भाटिया आणि विवेक ओबेरॉय एका चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची चर्चा होती. तुहीन सिन्हा यांच्या ‘आॅफ लव अँड पॉलिटिक्स’ या पुस्तकावर आधारित चित्रपटात ही जोडी मुख्य भूमिकेत दिसेल, असे सांगितले जात होते. तमन्नाने मात्र या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. विवेकसोबत कोणताही चित्रपट साईन केला नसल्याचे स्पष्टीकरण तिने टिष्ट्वटरवर दिले आहे. तिने पोस्ट केले की, ‘प्रिय चाहत्यांनो आणि मीडिया, मी हे स्पष्ट करू इच्छिते की विवेकसोबत कोणताही चित्रपट साईन करण्यासाठी काहीही चर्चा झालेली नाही. मला आजवर यासाठी कोणीही संपर्क केलेला नाही’. तमन्ना सध्या तिच्या तेलुगू आणि तामिळ भाषेतील चित्रपटांमध्ये बिझी आहे. इट्स एंटरटेनमेंट या हिंदी चित्रपटात तमन्ना दिसली होती.