Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टारडम गमावण्याची भीती नाही

By admin | Updated: September 15, 2014 23:35 IST

मागील वर्षी ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘ये जवानी हैं दिवानी’ आणि ‘रेस 2’सारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी दीपिका पदुकोण सध्याची आघाडीची नायिका बनली आहे.

मागील वर्षी ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘ये जवानी हैं दिवानी’ आणि ‘रेस 2’सारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी दीपिका पदुकोण सध्याची आघाडीची नायिका बनली आहे. दीपिका या क्षेत्रत स्वत:ला सुरक्षित मानते; पण तिला हे ही माहीत आहे की, चित्रपटांमध्ये तिची नेहमीच मागणी राहणार नाही. दीपिकाला जेव्हा तिला स्टारडम गमावण्याची भीती वाटते का, असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने उत्तर दिले की, नाही, अजिबात नाही. मला माहितीये हे स्टारडम मला जीवनभर पुरणार नाही. हे अशक्य आहे. एखाद्याला जर असे वाटत असेल, तर ती व्यक्ती भ्रमात आहे असे मी म्हणोल.’ दीपिकाचा चित्रपट ‘फायंडिंग फेनी’ नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाची प्रशंसा केली जात आहे. ती म्हणाली की, ‘मी फार कमी वेळा माङया कामावर समाधानी असते. मी स्वत:ची प्रशंसा फारच कमी करते. मला वाटते की, निंदा करणो एक चांगली गोष्ट आहे, कारण त्यामुळे चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.