अनेक मालिका, जाहिराती आणि आयेशा, ब्लड मनी यांसारख्या चित्रपटाच्या माध्यामातून लोकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता पुरी आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. निखिल आडवाणी दिग्दर्शित पीओडब्ल्यू-बंदी युद्ध के या मालिकेत एका मुख्य भूमिकेत ती दिसणार आहे. तिच्या या भूमिकेविषयी लोकमत सीएनएक्सने तिच्याशी साधलेला हा खास संवाद. या भूमिकेसाठी तुझी निवड कशा प्रकारे झाली?गेल्या २ वर्षांपासून मी आणि निखिल एकत्र काम करण्याचा प्रयत्न करत होतो. याआधीही त्यांनी एका मालिकेत माझी मुख्य भूमिकेसाठी निवड केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ती मालिका पडद्यावर येऊ शकली नाही. निखिलने मला त्यावेळी सांगितले होते, की आपण नक्की एकत्र काम करू , मात्र त्यानंतर मी ते विसरून गेले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निखिलने मला कॉल करून त्याच्या या नव्या प्रोजेक्टविषयी सांगितले. त्यानंतर मी मालिकेची कथा वाचली. ती मला फारच इंटरेस्टिंग वाटली. मी त्या भूमिकेच्या प्रेमातच पडले. तुझ्या या मालिकेतील भूमिकेविषयी काय सांगशील?मी हरलीन कौर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. हरलीनचे वयाच्या १७व्या वर्षी लग्न होते. लग्नाच्या रात्री तिचा पती तिला सोडून कारगिलच्या युद्धासाठी जातो. यानंतर त्याचे या युद्धात निधन झाल्याची बातमी येते. अवघ्या १७व्या वर्षी हरलीन संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारते. हरलीनच्या भूमिकेने वैयक्तिक आयुष्यात मला खूप काही गोष्टी शिकवल्या, एवढे मी नक्कीच सांगेन. तू नेहमीच चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या दिग्दर्शकांसोबतच टीव्ही मालिका केल्या आहेस, तू त्यांच्यासोबत जास्त कर्म्फटेबल फिल करतेस का? मला सासू-सूनेच्या मालिका करण्यात अजिबातच रस नाही आहे. त्या मालिका वाईट असतात, असे मी म्हणणार नाही. पण ज्या मालिका मला मनापासून पाहायला आवडतात, त्याच मालिकेत मला काम करायला आवडते. मी खूप कमी इंडियन टेलिव्हिजन बघते. २४ सारख्याच काही निवड मालिकाच बघितलेल्या आहेत.टीव्ही मालिका आणि वेब सिरीजमुळे कलाकारांना आता जास्त पर्याय उपलब्ध झाले आहेत असे तुला वाटते का?हो नक्कीच, टीव्हीचा पर्याय हा खूप आधीपासून कलाकारांकडे आहे. मात्र वेब सिरीजमुळे खूपच आॅप्शन उपलब्ध झाले आहेत. वेब सिरीजचा कंटेंटदेखील खूप चांगला असतो. बरेच वेगवेगळे प्रयोग यात केले जातात. तसेच यात रिस्कदेखील खूपच कमी असते. चित्रपट तयार करताना तुम्हाला स्टारच्या निवडीपासून तुमच्या बजेटपर्यंत प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्यायला लागते. बेव सिरीजमध्ये मात्र तसे नाही. तसेच तुम्हाला तुमची इमेज बदलायलाही बेव सिरीज मदत करते.
‘वेब सिरीजमुळे अनेक पर्याय उपलब्ध झाले’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 01:53 IST