Join us

...तर विद्या पुन्हा मराठीत

By admin | Updated: July 6, 2016 07:53 IST

विद्या बालन ‘एक अलबेला’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतीच एका मराठी कार्यक्रमात झळकली होती. त्या वेळी अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावे तिथे उपस्थित होता.

विद्या बालन ‘एक अलबेला’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतीच एका मराठी कार्यक्रमात झळकली होती. त्या वेळी अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावे तिथे उपस्थित होता. विद्याने त्या वेळी सुबोधच्या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाचे कौतुक केले होते. ‘सुबोध हा खूप चांगला दिग्दर्शक असून त्याच्यासोबत काम करायला आवडेल,’ असेही ती त्या वेळी म्हणाली होती. सध्या विद्या तिच्या ‘बेगम जान’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर कथा ऐकण्यासाठी ती सुबोधला भेटणार असल्याचे कळतेय. विद्याला सुबोधच्या चित्रपटाची कथा आवडली, तर विद्या मराठी चित्रपटात पुन्हा एकदा झळकणार आहे.