Join us  

अदा शर्माचं स्वयंवर? 'केरळ स्टोरी' फेम अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण, 'ती' पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 12:53 PM

अदाच्या एका पोस्टमुळे या चर्चांना आणखी उधाण आलंय.

अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) 'द केरळ स्टोरी' सिनेमामुळे एका रात्रीत स्टार झाली. तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. सध्या अदा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या मराठी कविता, तिचे अॅक्शन सीन्स, किंवा तिची मजामस्ती चाहत्यांना बघायला खूपच आवडते. अदा लग्न कधी करणार? या चर्चाही नेहमी होत असतात. आता अदाच्या एका पोस्टमुळे या चर्चांना आणखी उधाण आलंय.

अदा शर्मा तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये सध्या व्यस्त आहे. केरळ स्टोरीचे निर्माते विपुल शाह यांच्याच आगामी 'बस्तर' सिनेमाचं ती शूट करत आहे. अदाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. ज्यामध्ये ती जॅकी चॅनचे अॅक्शन डायरेक्टर एंडी लॉन्गसोबत गन शूटिंग करताना दिसत आहे. या व्हिडिओला तिने 'अदा का स्वयंवर' असं कॅप्शन दिल्याने तिच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र पुढे तिने योग्य गन निवडत असल्याचंही लिहिलं आहे. म्हणजेच काय तर ती योग्य जोडीदार नाही तर सध्यातरी तिच्या शूटसाठी योग्य गन च्या शोधात आहे.

अदा शर्माने 1920 या बॉलिवूड सिनेमात काम केले होते. याशिवाय तिने अनेक साऊथ सिनेमांतही भूमिका साकारली आहे. 'द केरळ स्टोरी' ने तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. सिनेमाने २०० कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला. यानंतर तिने 'कमांडो 3' मध्येही काम केले. यातील तिच्या अॅक्शन सीन्सची जोरदार चर्चा होती. 

टॅग्स :अदा शर्माबॉलिवूडलग्नसोशल मीडिया