Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीनं बांधली लग्नगाठ, लग्नाचा पहिला फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 19:03 IST

मराठी कलाविश्वात लग्नसराई पाहायला मिळत आहे. गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, अभिनेता ऋषी मनोहर-तन्मई पेंडसे, अभिनेता सिद्धार्थ बोडके- अभिनेत्री तितिक्षा तावडे, पूजा सावंतनंतर आता आणखी एका अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे.

मराठी कलाविश्वात लग्नसराई पाहायला मिळत आहे. गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, अभिनेता ऋषी मनोहर-तन्मई पेंडसे, अभिनेता सिद्धार्थ बोडके- अभिनेत्री तितिक्षा तावडे, पूजा सावंतनंतर आता आणखी एका अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे. ही अभिनेत्री म्हणजे माझे मन तुझे झाले फेम अभिनेत्री स्वरदा ठिगळे (Swarda Thigale). आज स्वरदा तिचा प्रियकर सिद्धार्थ राऊतसोबत विवाहबंधनात अडकली आहे. 

स्वरदा ठिगळे हिचा जानेवारी महिन्यात साखरपुडा सिद्धार्थ राऊतसोबत पार पडला होता. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर आता ती विवाहबंधनात अडकली आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर तिने तिच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवरुन समजते आहे की, ती आज विवाहबंधनात अडकली आहे. 

स्वरदाचा नवरा सिद्धार्थ राऊत हा डिझायनर आहे. स्वरदाने इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत ते दोघे रोमँटिक अंदाजात पाहायला मिळाले.

वर्कफ्रंट.. स्वरदा ठिगळे हिने तिच्या करियरची सुरूवात मराठी कलाविश्वातून केली आहे. २०१३ साली तिने माझे मन तुझे झाले या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेत तिने शुभ्राची भूमिका केली होती. ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तसेच २०१७ साली तिने सावित्री देवी कॉलेज या हिंदी मालिकेत काम केले होते. याशिवाय ती स्टार भारत वाहिनीवरील ‘प्यार के पापड’ मालिकेत झळकली होती. शेवटची ती ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती.  

टॅग्स :सेलिब्रेटी वेडिंग