Join us
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या महाराष्ट्राने केलं रितेश भाऊचं तुफानी स्वागत!, बिग बॉस मराठी ६च्या प्रोमोला मिळतोय उदंड प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:13 IST

Bigg Boss Marathi 6 : कलर्स मराठीने नुकताच बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा प्रोमो प्रदर्शित केला आणि प्रोमोला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. अवघ्या १२ तासांत २.४ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवत हा प्रोमो सोशल मीडियावर ट्रेंड होतोय.

कलर्स मराठीने नुकताच बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा प्रोमो प्रदर्शित केला आणि प्रोमोला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. अवघ्या १२ तासांत २.४ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवत हा प्रोमो सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. “स्वागताला मनाची आणि घराची दारं उघडी ठेवा…” या ओळींपासूनच भावनांचा सूर पकडणारा हा प्रोमो महाराष्ट्राच्या मनात घर करून बसला आहे. बिग बॉस मराठी ६ चा बिगुल वाजलाय… आणि महाराष्ट्र सज्ज झालाय आपल्या लाडक्या भाऊसोबत पुन्हा एकदा या प्रवासात सहभागी होण्यासाठी. बिग बॉस मराठी ६ सुरू ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळेल.

पारंपरिक वेशभूषेत आणि दमदार स्वॅगमध्ये दिसणारा रितेश देशमुख म्हणजे केवळ शोचा होस्ट नाही, तर तो महाराष्ट्राचा ‘आपला भाऊ’ आहे, हे या प्रोमोने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. ढोल-ताशांच्या गजरात, भव्य मिरवणुकीतून होणारी त्यांची एंट्री, हजारो लोकांचा जल्लोष आणि आजीच्या मिठीतला हळवा क्षण… प्रत्येक फ्रेममधून आपुलकी, संस्कृती आणि महाराष्ट्रप्रेम ओसंडून वाहत आहे. त्यामुळेच हा प्रोमो पाहणाऱ्यांसाठी फक्त एक घोषणा न राहता एक भावनिक अनुभव ठरत आहे. 

''मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तयार!'' या कडक संवादाने प्रेक्षकांची धडधड आणखी वाढवली आहे. यंदा स्वॅग तोच असणार असला, तरी पॅटर्न मात्र भाऊचा असणार. घरात कोण येणार, कोणाची परीक्षा होणार, कोणाचं नशीब फळाला येणार, हे सगळं अजून गुपित असलं, तरी चर्चांना मात्र उधाण आलं आहे. महाराष्ट्रात सध्या एकच विषय, एकच उत्सुकता बिग बॉस मराठी सीझन ६ची. या प्रोमोसोबतच बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची अधिकृतपणे घोषणा झाली असून एका नव्या, थरारक आणि भावनिक प्रवासासाठी प्रेक्षक सज्ज झाले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ritesh Deshmukh's 'Bigg Boss Marathi 6' promo receives massive response.

Web Summary : Colors Marathi's 'Bigg Boss Marathi 6' promo, featuring Ritesh Deshmukh, has garnered immense popularity, trending on social media with millions of views. The promo emphasizes Maharashtra's culture and Ritesh's connection with the audience. The show starts January 11th on Colors Marathi and Jio Hotstar.
टॅग्स :रितेश देशमुखबिग बॉस मराठी