Join us

महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरची मुलगी दिसते खूपच सुंदर, या गाण्यावर केलेल्या डान्सचा होतोय VIDEO VIRAL

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 20:41 IST

Mahesh Babus Daughter : महेश बाबूची लेक सितारा घट्टामनेनी हिनेही आता अभिनय क्षेत्रात पदार्पण केले असून, तिने केलेल्या एका डान्सचा व्हिडीओ सध्या जबरदरस्त व्हायरल होत आहे.

मुंबई - दक्षिणेच्या चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार महेश बाबूबाबत सिनेरसिकांमधील क्रेझ ही सर्वश्रुत आहे. त्यातच नम्रता शिरोडकरसोबत विवाह केल्याने मराठी सिनेरसिकांमध्येही त्याच्याबाबत कमालीचे आकर्षण दिसून येते. लोक महेश बाबूच्या प्रोफेशनल लाईफपासून ते पर्सनल लाईफपर्यंत सर्वकाही जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. दरम्यान, महेश बाबूच्या फॅन्ससाठी एक जबरदस्त सप्राईज समोर आले आहे. महेश बाबूची लेक सितारा घट्टामनेनी हिनेही आता अभिनय क्षेत्रात पदार्पण केले असून, तिने केलेल्या एका डान्सचा व्हिडीओ सध्या जबरदरस्त व्हायरल होत आहे.

महेश बाबूची मुलगी सितारा घट्टामनेनी हिने सरकारू वारी पाता मधील गाण्यावरील व्हिडीओमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. निर्मात्यांनी सिताराचा हा व्हिडीओ पेनी सॉन्ग्स या शीर्षकासह प्रसिद्ध केला आहे.

दरम्यान, सितारा हिच्या पेनी सॉन्ग्सच्या प्रोमोला जबरदरस्त प्रतिक्रिया मिळत आहेत. तिच्या अनेख्या डान्स स्टेप्स आणि स्टाईलने फॅन्सचे मन जिंकले आहे. दरम्यान, याच्या निर्मात्यांनी संपूर्ण गाणे रविवारी रिलीज केले जाईल, असे सांगितले आहे.

महेश बाबूच्या सरकारू वारी पाटा या चित्रपटाचे दिग्दर्शन परशुराम हे करत आहेत. तसेच चित्रपटाबाबत समोर येत असलेल्या प्रत्येक अपडेटबरोबर उत्सुकता वाढवत आहेत. महनतीमधील अभिनेत्री किर्ती सुरेश हिने सरकारू वारी पाटा चित्रपटात मुख्य भूमिका केली आहे.   

टॅग्स :महेश बाबूबॉलिवूडनम्रता शिरोडकर