कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर १ फेब्रुवारी रोजी सुरु झालेला 'द 50' शो सध्या चर्चेत आहे. शोमध्ये स्पर्धक एकाच घरात राहत असून सर्वांना टीममध्ये विभागलं गेलं आहे. त्यांच्यात अनेक खेळ खेळले जात आहेत. या हिंदी शोमध्ये काही मराठी चेहरेही आहेत. बिग बॉस मराठी मध्ये सहभागी झालेली आर्या जाधव, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल आणि शिव ठाकरे हे द ५० गाजवत आहेत. दरम्यान या शोमध्येही आर्या आणि निक्की बिग बॉसमधल्याच विषयावरुन इथेही भांडत आहेत.
'बिग बॉस मराठी ५'मध्ये आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या कानाखाली मारली होती. यानंतर आर्याला घरातून बाहेर काढण्यात आलं. बिग बॉस संपल्यानंतर या दोघी पुन्हा कधीच भेटल्या नाहीत. आता 'द ५०' या हिंदी रिएलिटी शोमध्ये दोघी आमनेसामने आल्या आहेत. निक्की आणि आर्या यांच्यात पुन्हा बिग बॉसमधलंच भांडण सुरु झालं आहे. तर नेहमीप्रमाणे जान्हवी किल्लेकर निक्कीच्या बाजूने उभी आहे. निक्की आर्याला उकसवत आहे. तर आर्याही तिला सडेतोड उत्तरं देत आहे. दोघी एकमेकींवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. एका हिंदी शोमध्ये या दोन मराठी मुलींनी भांडणातून अख्खा शोच डोक्यावर घेतला आहे.
याआधीही प्रोमोमध्ये निक्की तांबोळी रडताना दिसत होती. तर आर्या आक्रमत होती. नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आर्या जाधवचीच बाजू घेतली आहे. 'आर्या रॉक', 'जान्हवी पुन्हा तेच करत आहे निक्कीची बाजू घेत आहे आणि स्वत:चा काहीच स्टॅण्ड घेत नाही' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
Web Summary : Arya and Nikki, former Bigg Boss Marathi contestants, reignite their feud on the Hindi reality show 'The 50'. Their past conflict, involving a physical altercation, resurfaces, dominating the show. Janhavi supports Nikki, sparking online debate with viewers siding with Arya.
Web Summary : बिग बॉस मराठी की पूर्व प्रतियोगी आर्या और निक्की हिंदी रियलिटी शो 'द 50' में फिर भिड़ गईं। उनके बीच पहले हुई लड़ाई फिर से शुरू हो गई, जिससे शो में हंगामा मच गया। जान्हवी ने निक्की का समर्थन किया, जिससे दर्शकों ने आर्या का पक्ष लिया।