'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका कायमच तिचं स्थान टिकवून असते. या मालिकेबरोबरच त्यातील पात्रांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांना भावते. ठरलं तर मग' ही मालिका सध्या मोठ्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत अर्जुन-सायली पुन्हा लग्न बंधनात अडकणार असल्याचं आगामी एपिसोडमध्ये असे दाखवण्यात येणार आहेत. अशातच आता मालिकेत कुसुम हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा दानडेच्या ( Disha Danade Akka Kusum) लग्नाला पाच वर्ष झाली आहेत.
'ठरलं तर मग' मालिकेत सहकलाकाराच्या भूमिकेत असलेली दिशा दानडे प्रेक्षकांचं नेहमीच लक्ष वेधून घेत असते. दिशाने लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. "पाच वर्षे…लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जान" असं कॅप्शन देत दिशाने ही रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.
दिशाच्या पतीदेखील एक अभिनेता आहे. त्याचं नाव सुहास लखन असं आहे. दिशा आणि सुहास यांनी २०२० मध्ये थाटामाटात लग्न केलं होतं. दिशाचा पती सुहास काही दिवसांपूर्वी 'धर्मवीर २' चित्रपटात पाहायला मिळाला होता. या सिनेमात त्याने रवींद्र फाटक यांची भूमिका साकारली होती. याशिवाय सुहासने काही नाटक आणि चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे. दिशा दानडे ला कुसुम या भूमिकेने लोकप्रियता मिळवून दिली आहे. 'ठरलं तर मग' मालिकेमुळे दिशा घराघरात पोहोचली आहे. मालिकेत कायम सायलीची साथ देणारी कुसुम प्रेक्षकांना खूप आवडते.