Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ठरलं तर मग' मालिकेतील सायली दोन दिवसांपासून गायब, जुई गडकरीला नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:54 IST

जुई सध्या आजारी असून उपचार घेत आहे.

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' सध्या टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या मालिकेमध्ये सायली आणि अर्जुनच्या नात्याभोवती फिरणारी कथा प्रेक्षकांना खूप भावतेय. सायलीची भूमिका अभिनेत्री जुई गडकरी साकारत असून तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांमध्ये खूप कौतुक होतंय. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मालिकेमध्ये सायली म्हणजेच जुई गडकरी दिसत नाहीये, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिच्याबद्दल उत्सुकता आणि काळजी निर्माण झाली आहे. अखेर जुई गडकरीनं स्वतः इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ती सध्या आजारी असल्याचं सांगितलं आहे.

जुई गडकरीच्या पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये जुईने तिच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे.  ती म्हणते, "कृपया कुठेही जाऊन पाणी पिऊ नका, पाणी उकळूनच प्या. घरचं अन्नच खा. औषधं, शूटला जाणं आणि सलाईन हेच सध्या आयुष्य आहे. मला कावीळ झाली आहे". या पोस्टसोबत तिने एक फोटोही शेअर केला आहे, ज्यात तिचा चेहरा आजारामुळे सुजलेला आणि थकलेला दिसतोय.

 'ठरलं तर मग' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असल्यामुळे, कलाकारांना अनेकदा  प्रकृती अस्वस्थ असतानाही काम करावं लागतं. जुईलाही याचाच फटका बसला आहे. तिच्या आजारामुळे सध्या ती मालिकेतून काही काळासाठी दूर आहे.पण तिचे चाहते तिच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत. 

टॅग्स :जुई गडकरीमराठी अभिनेता