कोरियोग्राफर आणि सेलिब्रिटी जज टेरेंस लुईसने ‘नच बलिए’साठी स्वत:चा मेकओव्हर केला आहे. त्याने या शोसाठी सिक्स पॅक अॅब्ज बनवले आहेत. याबाबत टेरेंस म्हणाला की, ‘नच बलिए या शोची ऑफर मिळाली होती, तेव्हाच मी ठरवले होते की, फक्त कपडे आणि हेअरस्टाईल नाही, तर संपूर्ण मेकओव्हर करावे. हा एक वेगळा शो आहे. मी या शोमध्ये लहान मुले किंवा तरुणांना जज करणार नाही, तर अनेक टीव्ही स्टार्सना जज करणार आहे. ‘नच बलिए’ एक परिपक्व शो असून या शोमध्ये मलाही परिपक्व दिसण्याची गरज होती. मी माङया चॉकलेट बॉय क्लीन शेव लूकमुळे बोअर झालो होतो.