Join us
Daily Top 2Weekly Top 5

चित्रांगदा-सुधीर मिश्रा यांच्यात तणाव

By admin | Updated: June 5, 2014 09:09 IST

चित्रांगदाने सुधीर मिश्रा यांच्या अनेक चित्रपटांत काम केले; पण सध्या त्यांच्या नात्यात तणाव आल्याची बातमी आहे.

चित्रांगदा सिंहला बॉलीवूडमधील पहिली संधी सुधीर मिश्रा यांनी त्यांच्या ‘हजारो ख्वाहिशें ऐसी’ या चित्रपटातून दिली होती. त्यानंतर चित्रांगदाने सुधीर मिश्रा यांच्या अनेक चित्रपटांत काम केले; पण सध्या त्यांच्या नात्यात तणाव आल्याची बातमी आहे. हा तणाव एवढा वाढला आहे की, दोघे एकमेकांशी बोलतही नाहीत, त्यामुळे आता मिश्रांचा मेहरुनिस्सा अधांतरी आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर अजूनही चित्रपट सुरू होऊ शकलेला नाही. सूत्रांनुसार याच चित्रपटामुळे चित्रांगदा मिश्रांवर नाराज आहे. अनेक महत्त्वाच्या डेटस् तिने या चित्रपटाला दिल्या होत्या. त्या तर वाया गेल्याच, शिवाय त्यामुळे अनेक चांगले चित्रपट तिच्या हातून निसटले. त्याशिवाय चित्रांगदाच्या प्रोफेशनल लाईफमध्ये मिश्रांची दखल हा ही या तणावामागचे कारण असल्याचे म्हटले जात आहे.