स्टँड-अप कॉमेडी क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणजे 'सख्त लौंडा' झाकीर खान. त्याच्या स्टँड-अप कॉमेडीचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या शोला प्रचंड गर्दी होते. पण, आता झाकीरनं 'लाईव्ह परफॉर्मन्स'मधून प्रदीर्घ ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. हा ब्रेक तब्बल २०३० पर्यंत असण्याची शक्यता आहे, असं त्यानं सांगितलंय. पण, त्यानं हा ब्रेक का घेतला, झाकीरच्या प्रकृतीबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. तर सत्य काय आहे ते आपण जाणून घेऊया.
झाकीरला कोणताही एक विशिष्ट 'गंभीर' आजार झालेला नाही. मात्र, गेल्या १० वर्षांच्या सततच्या धावपळीमुळे तो थकला आहे. गेल्या दशकापासून झाकीर एका दिवसात २-३ शोज आणि सतत प्रवास करत आहे. अपुरी झोप, खाण्याच्या विस्कळीत वेळा आणि विश्रांतीचा अभाव यामुळे त्याच्या शरीरावर प्रचंड ताण आला आहे. झाकीरने स्वतः कबूल केले की, तो गेल्या एका वर्षापासून आजारी होता, मात्र कामाच्या व्यापामुळे त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. आता डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांती घेण्याचा कडक सल्ला दिला आहे.
झाकीरने केवळ आरोग्यासाठीच नाही, तर काही वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांसाठीही हा निर्णय घेतला आहे. २०३० पर्यंत तो स्टँड-अपपासून लांब राहील, जेणेकरून तो पुन्हा पूर्ण ताकदीने आणि नव्या संकल्पनांसह मंचावर परतू शकेल. २०१२ मध्ये 'कॉमेडी सेंट्रल'ची स्पर्धा जिंकल्यापासून झाकीरचा प्रवास थक्क करणारा आहे. 'हक से सिंगल', 'काक्षा ग्यारहवी' आणि 'तथास्तु' यांसारख्या सुपरहिट शोजमुळे तो प्रचंड लोकप्रिय झाला. विशेष म्हणजे, न्यूयॉर्कच्या ऐतिहासिक मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये हिंदीत परफॉर्म करणारा तो पहिला भारतीय ठरलाय. अशा यशस्वी वळणावर असताना झाकीरने घेतलेल्या या निर्णयामुळं त्याचे चाहते भावुक झाले आहेत.
Web Summary : Comedian Zakir Khan, known as 'Sakht Launda,' is taking a performance break until 2030 due to exhaustion from relentless touring and shows. Doctors advised rest, citing health reasons and personal commitments for his decision after a decade of continuous work.
Web Summary : 'सख्त लौंडा' के नाम से मशहूर कॉमेडियन ज़akir खान लगातार यात्रा और शो के कारण थकावट के चलते 2030 तक प्रदर्शन से ब्रेक ले रहे हैं। डॉक्टरों ने स्वास्थ्य कारणों और व्यक्तिगत प्रतिबद्धताओं का हवाला देते हुए एक दशक के निरंतर काम के बाद आराम करने की सलाह दी।