Join us

"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:38 IST

चहल आणि आरजे महावशला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं. त्यांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा रंगल्या. मात्र, दोघांनी याबाबत ऑफिशियल काहीच सांगितलं नाही.

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. धनश्री वर्मासोबत घटस्फोट घेतल्यानंतर चहलचं नाव आरजे महावशसोबत जोडलं जात आहे. आयपीएलदरम्यान आरजे महावश चहलला चीअर अप करताना दिसली. चहल आणि आरजे महावशला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं. त्यांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा रंगल्या. मात्र, दोघांनी याबाबत ऑफिशियल काहीच सांगितलं नाही. आता एका शोमध्ये चहलने आरजे महावशसोबतच्या त्याच्या नात्याबाबत हिंट दिली आहे. 

युजवेंद्र चहलने नुकतीच कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली होती. त्याच्यासोबत गौतम गंभीर, ऋषभ पंत आणि अभिषेक शर्मादेखील होते. या शोमध्ये कलाकारांनी चहलची फिरकी घेतली. अभिनेता किकूने मुलीच्या गेटअपमध्ये येत चहललला विचारले, "तुझ्या शर्टवर लिपस्टिकचा डाग का आहे? हे काय चाललंय चहलजी? ती कोण आहे? देशाला जाणून घ्यायचं आहे".  त्यावर चहल म्हणाला, "आता संपूर्ण देशाला माहीत आहे". चहलच्या या वक्तव्यामुळे तो आरजे महावशसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

दरम्यान, युजवेंद्र चहल त्याच्या खेळीने मैदान गाजवतो. चहलने २०२०मध्ये धनश्री वर्मासोबत लग्न करत संसार थाटला होता. लॉकडाऊनमध्ये त्यांची ओळख झाली होती. नंतर काही वेळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, लग्नानंतर ५ वर्षांनी घटस्फोट घेत ते आता वेगळे झाले आहेत. 

टॅग्स :युजवेंद्र चहलटिव्ही कलाकार