Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही आहे येऊ कशी तशी मी नांदायलामधील ओम म्हणजेच शाल्व किंजवडेकरची रिअल लाईफ स्वीटू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 19:22 IST

शाल्व किंजवडेकरने एका मुलीसोबत सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे.

ठळक मुद्देशाल्व किंजवडेकरला तर या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली असून त्याच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घ्यायची त्याच्या फॅन्सची नेहमीच इच्छा असते.

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिका दिवसेंदिवस रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर या फ्रेश जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या दोघांची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

शाल्व किंजवडेकरला तर या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली असून त्याच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घ्यायची त्याच्या फॅन्सची नेहमीच इच्छा असते. त्याने काही दिवसांपूर्वी एका मुलीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता आणि त्यासोबत लिहिले होते की, वेडेपणाचे आणि प्रेमाचे दोन वर्षं पूर्ण.... हॅपी एनिव्हर्सरी... ही पोस्ट पाहून ही मुलगी शाल्वची खऱ्या आयुष्यातील स्वीटू ही आहे का या चर्चांना उधाण आले होते. 

शाल्वने या मुलीसोबत याआधी देखील अनेक फोटो शेअर केले आहेत. या दोघांची जोडी खूपच छान असल्याचे त्याचे फॅन्स त्याला नेहमीच कमेंटच्या माध्यमातून सांगत असतात. शाल्व खरंच या मुलीसोबत नात्यात आहे का यावर त्याने मौन राखणेच पसंत केले आहे. 

टॅग्स :झी मराठी