Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही अभिनेत्री साकारतेय येऊ कशी तशी मी नांदायलामध्ये महत्त्वाची भूमिका, ओळखा पाहू कोण आहे ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 16:57 IST

या अभिनेत्रीचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

ठळक मुद्देया मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. स्वीटू आणि ओमची प्रेमकथा आपल्याला येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत पाहायला मिळत आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका काहीच महिन्यांपूर्वी सुरू झाली असून ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. तसेच या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. स्वीटू आणि ओमची प्रेमकथा आपल्याला येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत पाहायला मिळत आहे. स्वीटू ही गरीब आहे तर ओम हा अतिशय श्रीमंत आहे. ओम नेहमीच स्वीटूच्या प्रत्येक समस्येत तिच्या पाठिशी उभा राहातो. ओमच्या आईची देखील स्वीटू प्रचंड लाडकी आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओमच्या आईच्या भूमिकेत आपल्याला शुभांगी गोखले यांना पाहायला मिळत आहे. शुभांगी गोखले या गेल्या अनेक वर्षं मालिका, चित्रपटांमध्ये काम करत आहेत. त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी मालिकांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 

शुभांगी गोखले यांची मुलगी सखी गोखलेने काही दिवसांपूर्वी तिच्या अकाऊंटवर शुभांगी गोखले यांचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत त्यांना ओळखणे देखील कठीण जात आहे. शुभांगी गोखले या फोटोंमध्ये खूपच छान आणि वेगळ्या दिसत आहेत. हा शुभांगी यांचा जुना फोटो असून त्या या फोटोत खूपच छान दिसत असल्याचे त्यांचे चाहते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

टॅग्स :सखी गोखलेझी मराठी