Join us

ही गोंडस मुलगी साकारतेय छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेत मुख्य भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 15:59 IST

या अभिनेत्रीने तिच्या लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ठळक मुद्देअन्विताने तिच्या लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच गोंडस दिसत आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेने फार कमी वेगळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळ स्थान निर्माण केलंय. या मालिकेतील प्रत्येक पात्राचं मोठं फॅन फॉलोविंग तयार झालंय. येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील स्वीटू अर्थात अन्विता फलटणकर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते आणि त्यांना चाहत्यांची देखील पसंती मिळते.

अन्विताने तिच्या लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच गोंडस दिसत आहे. काहीच महिन्यांची अन्विता आपल्याला या फोटोत पाहायला मिळत आहे. तू आजही तितकीच छान दिसते असे तिचे चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. अन्विताचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रवी जाधवने दिग्दर्शित केलेला टाईमपास हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, भाऊ कदम आणि वैभव मांगले यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात केतकीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत अन्विता झळकली होती. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तसेच तिने गर्ल्स या चित्रपटात देखील मुख्य भूमिका साकारली आहे.

टॅग्स :झी मराठी