Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ये है मोहब्ब्तें' मालिकेतील अभिनेता संग्राम सिंहला कन्यारत्न, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 16:27 IST

गुरकिरनने मुलीला जन्म दिल्यानंतर दोघांच्याही आनंदाला उधान आलंय. संग्रामने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ''इट्स गर्ल'' अशी कॅप्शन दिली आहे.

किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला....या गाण्यांच्या ओळीप्रमाणे काहीशी अवस्था झालीय  अभिनेता संग्राम सिंहची. कारण त्यांच्या घरी आला एक छोटा पाहुणा...तिच्या आगमनानं सारं वातावरण आनंददायी झालंय. लग्नाच्या दोन वर्षानंतर संग्राम सिंह बाबा बनला आहे. संग्राम 2017 मध्ये गुरकिरनसह लग्नबंधनात अडकला होता. मालिकेतील कलाकार मंडळींसह जवळच्या मित्र मंडळींनी त्याच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आयुष्याची नवीन सुरूवात अशी कॅप्शन देत लग्नाची बातमी दिली होती. मध्यंतरी  गुरकिरण लवकरच आई बनणार आहे. ती प्रेग्नन्ट असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावेळी संग्रामने शूटिंगमधून ब्रेक घेत गुरकिरणची काळजी घेण्यासाठी जास्त घरीच वेळ दिला होता.

आता गुरकिरनने मुलीला जन्म दिल्यानंतर दोघांच्याही आनंदाला उधान आलंय. संग्रामने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ''इट्स गर्ल'' अशी कॅप्शन दिली आहे. संग्रामनेही गुड न्युज चाहत्यांसोबत शेअर करताच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. एकूणच या परीच्या आगमनानं कुटुंबीयांचा उत्साह ओसंडून वाहतोय.

'ये हैं मोहब्बते' या मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांना भावल्या होत्या. 'ये है मोहब्ब्तें' मालिकेत संग्रामने अशोक खन्ना ही भूमिका साकारली होती. मालिकेतील इतर पात्रांप्रमाणे अशोक खन्नाही भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. 

टॅग्स :ये है मोहब्बतें