Join us

अंगात ताप असूनही 'येड लागलं प्रेमाचं' मधील अभिनेत्रीने शूट केला 'तो' सीन, म्हणाली- "शरीर थकतं, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:45 IST

अभिनेता विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची प्रमुख भूमिका असलेली 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका लोकप्रिय आहे.

Madhuri Pawar: अभिनेता विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची प्रमुख भूमिका असलेली 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका लोकप्रिय आहे. अगदी अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. राया आणि मंजिरीच्या जोडीला चाहत्यांचं विषेश प्रेम मिळत आहे. तसंच मालिकेतील आणखी पात्रांनीही प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. जीजी, इन्स्पॅक्टर घोरपडे, निक्की या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आता या मालिकेतील एका सीनच्या शूटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

दरम्यान, मालिकेतील निक्कीचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री माधुरी पवारने सोशल मीडियावर तिच्या एका सीनचा किस्सा सांगत पोस्ट लिहिली आहे. माधुरी पवार ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करते. अशातच 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेच्या एका भागासाठी पाण्याती एका सीनसाठी अभिनेत्रीने चक्क अंगात ताप असूनही शूटिंग केलं. असा खुलासा तिने केला आहे. माधुरीने शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन देत म्हटलंय की, "असा शूट झाला निक्की पाण्यात आणि प्रेमात पडण्याचा सीन. तापाने अंग तापलेलं, शरीर थकलेलं... पण कॅमेरा चालू झाला आणि मी पाण्यात उतरले. ती थंडी, ते कंप, आणि तरीही चेहऱ्यावर हसू कारण 'action' म्हणताच, कलाकार फक्त भावना जगतो, त्रास नाही. कधी कधी शरीर थकतं, पण मनाचं बळ असलं की अशक्य काहीच वाटत नाही." दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्रीचं भरभरुन कौतुक केलं आहे. शिवाय तिचं कामाप्रती असलेलं प्रेम पाहून चाहते भारावले आहेत. 

सध्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत  नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. निक्कीने राया-मंजिरीच्या आयुष्यात रोज काही ना काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्यामुळे राया-मंजिरीची मैत्री आणखी घट्ट होताना दिसते आहे. निक्की आणि जयचे प्लॅन राया यशस्वी होऊ देत नाही. त्यामुळे सुडाच्या भावनेने निक्की रायाला पाण्यात ढकळण्याचा प्रयत्न करते. त्यादरम्यानचा हा सीन दाखवण्यात येणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया