Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! सीझान खानच्या लग्नाची बातमी ऐकताच ही महिला म्हणाली, याने माझ्याशी केले होते लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 17:27 IST

एका मुलीने सीझान खानने २०१५ मध्ये तिच्यासोबत लग्न केले होते असा दावा केला आहे.

ठळक मुद्देआयशा पिरानी ही मुळची पाकिस्तानची असून सध्या अमेरिकेत राहाते. तिच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व असून २०१५ मध्ये सीझानने तिच्यासोबत लग्न केले होते असा तिने दावा केला आहे.

कसौटी जिंदगी की ही मालिका एकेकाळी चांगलीच प्रसिद्ध झाली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेतील सगळ्यात कलाकारांना त्याकाळात चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेत अनुराग ही मुख्य भूमिका सीझान खानने साकारली होती. या मालिकेनंतर सीता और गीता आणि एक लडकी अजनबी सी यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकला. पण गेल्या काही वर्षांपासून तो छोट्या पडद्यापासून दूर आहे. तो अनेक वर्षांपासून दुबईत राहात असून तो पाकिस्तानी मालिकांमध्ये काम करतो. 

सीझान लवकरच लग्न करणार असल्याचे त्याने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते. उत्तर प्रदेशमध्ये राहाणाऱ्या एका मुलीसोबत तो नात्यात असून लवकरच तिच्यासोबत लग्न करण्याचा त्याचा विचार आहे. पण त्याच्या या मुलाखतीनंतर एका मुलीने त्याने २०१५ मध्ये तिच्यासोबत लग्न केले होते असा दावा केला आहे. आयशा पिरानी ही मुळची पाकिस्तानची असून सध्या अमेरिकेत राहाते. तिच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व असून २०१५ मध्ये सीझानने तिच्यासोबत लग्न केले होते असा तिने दावा केला आहे. हे लग्न दोन वर्षं टिकले असे देखील तिने म्हटले आहे. आयशाने एका मुलाखतीत सांगितले आहे की, त्याने ५० वेळा देखील लग्न केले तरी मला काहीही फरक पडत नाही. पण त्याचे लग्न झालेले होते ही गोष्ट तो का लपवत आहे हेच मला कळत नाहीये. ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी त्याने माझ्यासोबत लग्न केले आणि ग्रीन कार्ड मिळाल्यानंतर त्याने मला घटस्फोट दिला. 

आयशाने हा दावा केल्यानंतर टाईम्स ऑफ इंडियाने सीझानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सीझानने सांगितले की, मी कधीही लग्न केलेले नाही. ही माझी एखादी फॅन असावी, जी माझ्या प्रेमात असेल. अशा लोकांच्या बाबतीत मी काहीही न बोलणेच पसंत करतो. माझ्याद्वारे ती पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2