तेनाली रामा या ऐतिहासिक नाट्यमय मालिकेतल्या रामाची बुद्धीमत्ता, विनोदवृत्ती आणि हजरजबाबीपणामुळे आजवर प्रेक्षकांनी या मालिकेवर भरभरून प्रेम केले आहे. या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की, तिरूमलांबा (प्रियांका सिंग) हिला जादूच्या फुलदाण्या मिळतात. या फुलदाण्या म्हणजेच शुभसंकेत आहेत आणि कृष्णदेवरायांच्या (मानव गोहिल) वंशजांना एका मोठ्या राजाने या फुलदाण्या भेट म्हणून दिलेल्या आहेत. राजाच्या आज्ञेनुसार, या फुलदाण्या सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोतवालावर सोपवण्यात आली असते. पण दुर्दैवाने, कोतवालाच्याच हातून यातील एक फुलदाणी फुटते. चिडलेल्या कृष्णदेवरायाने कोलवालाला आता मृत्यूदंड सुनावला आहे.
या निकालाने दुखावला गेलेला कोतवाल आणि त्याचे कुटुंबीय रामाची भेट घेतात आणि या शिक्षेतून त्याची सुटका करण्याची विनंती करतात. तुरुंगात बंदीवान असलेल्या कोतवालासह चर्चा करून रामा एक योजना आखतो.दुसऱ्या दिवशी, दरबारात हरज केल्यानंतर कोतवाल आपली अखेरची इच्छा बोलून दाखवतो. आपली शिक्षा आपल्याऐवजी रामाला द्यावी अशी तो इच्छा व्यक्त करतो आणि रामाही ते मान्य करतो. रामाला लवकरच अपत्यप्राप्ती होणार असल्याने राजाला हे ऐकून वाईट वाटते आणि रामाने या शिक्षेपासून मुक्त व्हावे, यासाठी राजाच त्याला काही मार्ग काढण्यास सांगतो.आता रामाची पुढची योजना काय असेल, तो स्वतःला आणि कोतवालाला या मृत्यूदंडापासून वाचवू शकेल काय?तेनाली रामाची भूमिका करणारा कृष्णा भारद्वाज म्हणाला, “आगामी भाग खूपच रोमांचक असणार आहे. मला हे चित्रीकरण करताना खूप मजा आली. यावेळी, कोतवालाचा जीव धोक्यात आहे आणि या अप्रिय परिस्थितीपासून स्वतःला आणि इतरांना वाचवण्याचा प्रयत्न रामा करणार आहे. त्याचबरोबर, कृष्णदेवरायाला खूष करण्याचाही त्याचा प्रयत्न राहणार आहे.