Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला पाहते रे' मध्ये ईशा करणार का राजनंदीचं स्वप्न पूर्ण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 06:30 IST

'तुला पाहते रे' मालिकेमध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे. ईशाच राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे सिद्ध झाले आहे.

ठळक मुद्दे ईशाला राजनंदिनीचं आयुष्य स्वप्नात दिसते ईशा विक्रांतला धडा शिकवेल का?

झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. टीआरपीच्या यादीतही ही मालिका नेहमी अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं.  या मालिकेमध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे. इतके दिवस ईशा निमकरला पडलेले स्वप्न खरे आहे की खोटे, याचा उलगडा होत असताना आता नुकतंच प्रसारीत झालेल्या भागात प्रेक्षकांनी पाहिलं कि ईशाच राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे सिद्ध झाले आहे.

ईशाला राजनंदिनीचं आयुष्य स्वप्नात दिसतं. त्यानंतर ईशाचा गोंधळ उडतो पण शेवटी ईशाला आपणच राजनंदीचा पुनर्जन्म असल्याची खात्री तिला पटते, तसंच तिच्या आयुष्याचं ध्येय देखील तिला कळतं. राजनंदिनीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि तिच्या मागच्या जन्माची देणी फेडण्यासाठी ईशाचा जन्म झाला आहे हे तिला उमगतं. आता ईशाने जयदीपच्या हाती व्यवसायाची सर्व सूत्र दिली आहेत तसंच ऑफिसमध्ये परांजपे यांच्या मदतीने ती विक्रांतला धडा शिकवण्यासाठी योजना आखात आहे. 

जयदीपला ऑफिसमधून काढण्यासाठी झेंडे शर्थीचे प्रयत्न करताना दिसतायेत. मात्र त्यात त्यांना यश मिळत नाही. ईशा विक्रांतला धडा शिकवेल का? विक्रांत त्याची चूक मान्य करेल का? झेंडे ईशाच्या जीवाला धोका तर नाहीना निर्माण करणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.

टॅग्स :तुला पाहते रे