Join us
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार की सुप्रिया सुळे? राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे पाहिजे? अमोल कोल्हे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 18:28 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे 'खुपते तिथे गुप्ते' शोमध्ये हजेरी लावणार आहेत.

लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेल्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोच्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कलाकार आणि राजकीय नेत्यांना अवधूत या मंचावर खुपणारे प्रश्न विचारुन बोलतं करत असतो. या शोच्या नवीन भागात अभिनेता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे हजेरी लावणार आहेत.

‘खुपते तिथे गुप्ते’ या शोच्या नवीन भागाचे काही प्रोमो व्हिडिओ समोर आले आहेत. सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट याबाबतही अवधूत गुप्तेने अमोल कोल्हेंना प्रश्न विचारले आहेत. यावर अमोल कोल्हे अगदी परखडपणे त्यांचं मत व्यक्त करताना दिसत आहेत. “अजित पवार की सुप्रिया सुळे? राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे असलं पाहिजे?” असा प्रश्न अवधूत गुप्ते अमोल कोल्हे यांना विचारतो. अवधूतच्या या प्रश्नाचं उत्तर देत अमोल कोल्हे क्षणाचाही विलंब न करता “शरद पवार” असं म्हणतात.

“महाराजांची भूमिका कधीही साकारू नकोस”, अमोल कोल्हेंना दिलेला सल्ला, पण...

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी बंड करत २ जुलैला भाजपा-शिवसेना सत्तेत सामील होत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी खासदार अमोल कोल्हेही अजित पवार गटात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोल्हेंनी ट्वीट करत शरद पवार यांच्याबरोबर असल्याचं सांगितलं होतं.  ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये अमोल कोल्हेंआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संजय राऊत यांनीही हजेरी लावली होती.

टॅग्स :अजित पवारसुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार