राखी आणि अर्शी अजय देवगणच्या ‘बादशाहो’ या सुपरहिट चित्रपटातील ‘मेरे रश्के कमर’ या गाण्यावर ठुमके लावताना दिसत आहेत. या व्यतिरिक्त राखीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघीही पाउट बनविताना पोज देत आहेत. राखीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, अर्शी खान माझी स्वीटहार्ट फ्रेंड आहे. माझी best baddy आहे.
हा फोटो शेअर केल्यानंतर यूजर्सनी कॉमेण्ट बॉक्समध्ये प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पाडला. काहींनी नेहमीप्रमाणे राखीची खिल्लीही उडविली. एका यूजरने लिहिले की, baddy नाही buddy असते. आणखी एका यूजरने लिहिले, ‘दोघीही baddyz’ तर आणखी एका यूजरने लिहिले की, ‘राखी तू नेहमीच असे का करीत असते?’ दरम्यान, राखी आणि अर्शीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जात आहे.