Join us
Daily Top 2Weekly Top 5

"देवानेच दिलंय, मग वाळीत का टाकायचं?" मासिक पाळी आणि देवपूजेवर विशाखा सुभेदारांचे रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:36 IST

मासिक पाळीदरम्यान देवपूजा करण्याबद्दल विशाखा सुभेदार यांनी मांडली रोखठोक भुमिका, म्हणाल्या...

विशाखा सुभेदार या मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री असून त्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत. त्यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामध्येही काम केलंय. त्याचबरोबर त्या काही मालिकांमध्येही झळकल्या आहेत. विशाखा सुभेदार या अभिनयासोबतच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखल्या जातात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. ज्यामध्ये त्यांनी मासिक पाळीदरम्यान देवपूजा करण्याबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत. 

मासिक पाळी (Periods) आणि त्या काळातील देवपूजा यांसारख्या सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयावर त्यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. त्या म्हणाल्या, "माझं असं काही नाही की मासिक पाळीदरम्यान पूजा करायची नाही. मी मानस पुजा करते. म्हणजे देवाला हळदी कुंकु नाही देत. लहानपणापासून आपल्या प्रथेप्रमाणे जे आपल्या डोक्यात रोवलं गेलंय, ते सहज पुसल्या जात नाही".

विशाखा यांनी सांगितलं की गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनानंतर त्यांच्या विचारात बदल झाला. त्या म्हणाल्या, "आता मी कामाख्याला जाऊन आले. तिथे तर देवीच त्या अवस्थेतील आहे.  तिथे सगळं चालतं. मग ते थोडसं माझ्या डोक्यातलं खोडलं गेलं की नाही, चालतं सगळं. देवानेच तर दिलं आहे. असं कशाला आपण त्याला वाळीत टाकायचं.  मग आता ते हळुहळु माझ्या संकल्पनेतून खोडलं गेलंय. पण, तरी मी त्यादरम्यान मानस पूजा करते. मानस पूजा जशी स्वामींची केली जाते. तशी मी सगळ्या देवांची करते"

आसामच्या गुवाहाटीत कामाख्या मंदिर स्थित 

आसाममधील गुवाहाटी येथील नीलाचल पर्वतावर स्थित कामाख्या देवी मंदिर हे सर्वात महत्त्वाच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे.धर्म पुराणानुसार, माता सतीने आपला देह सोडला, तेव्हा भगवान विष्णूने सती मातेशी असलेली भगवान शिवाची आसक्ती दूर करण्यासाठी आपल्या चक्राने सतीच्या शरीराचे ५१ भाग केले. हे भाग जिथे पडले तिथे तिथे मातेचं शक्तीपीठ तयार झालं. या ठिकाणी मातेची योनी पडली होती, त्यामुळे तिथे देवीची मूर्ती नसून तिच्या योनीची पूजा केली जाते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vishakha Subhedar on menstruation, worship: Why ostracize what God gave?

Web Summary : Actress Vishakha Subhedar shares her views on menstruation and worship, influenced by her visit to Kamakhya temple. She questions the practice of excluding menstruation women from religious activities, suggesting a shift towards mental worship during periods.
टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटी