Join us

'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 10:20 IST

बिग बॉस १९ (Bigg Boss 19) च्या प्रीमियरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खान(Salman Khan)च्या या रिअ‍ॅलिटी शोमध्ये अनेक मोठे चेहरे सामील होणार आहेत.

बिग बॉस १९ (Bigg Boss 19) च्या प्रीमियरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खान(Salman Khan)च्या या रिअ‍ॅलिटी शोमध्ये अनेक मोठे चेहरे सामील होणार आहेत. अपूर्वा मुखिजा, पुरव झा, राज कुंद्रा आणि लता सबरवाल यांची नावे समोर येत आहेत. आता महाकुंभात रुद्राक्षाच्या माळा विकून रातोरात लोकप्रिय झालेल्या मोनालिसा(Viral Girl Monalisa)च्या नावाची बरीच चर्चा आहे. अभिनेत्रीने रिअ‍ॅलिटी शोबद्दल सांगितले.

सलमान खान सूत्रसंचालक असलेल्या बिग बॉस १९ ऑगस्ट रोजी त्याच्या भव्य प्रीमियरसाठी सज्ज आहे. लाँचिंग जवळ येत असताना, रिअ‍ॅलिटी शोबद्दल अनेक अपडेट्स समोर येत आहेत. या सीझनमध्ये बॉलिवूड, टेलिव्हिजन इंडस्ट्री, युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरमधील सेलिब्रिटीज दिसतील. आता महाकुंभात रुद्राक्षाच्या माळा विकून प्रसिद्ध झालेल्या मोनालिसानेही या शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

मोनालिसा जाणार बिग बॉसच्या घरात?

खरेतर, मोनालिसाचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती प्रमोशनला जाताना दिसत आहे. ती काळ्या अनारकली सूटमध्ये खूप सुंदर दिसत आहे. दरम्यान, पापाराझीने तिला विचारले की तिला संधी मिळाल्यास बिग बॉसमध्ये जायला आवडेल का? यावर सोशल मीडिया सेन्सेशनने लगेचच म्हटले, "हो, मी नक्कीच जाईन." मात्र, अभिनेत्री शोचा भाग असेल की नाही याबद्दल सस्पेन्स आहे.

बिग बॉस १९ कधी येणार भेटीलाबिग बॉसचा नवीन सीझनचा प्रीमियर २९-३० ऑगस्ट २०२५ दरम्यान होण्याची शक्यता आहे आणि हा शो पाच महिने चालेल. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सीझन असल्याचे मानले जाते. मात्र, कलर्स टीव्हीने शोच्या प्रीमियरबद्दल अद्याप काहीही अधिकृत घोषणा केलेली नाही. यंदाच्या सीझनमध्ये राज कुंद्रा, लता सभरवाल, आशिष विद्यार्थी, गौरव तनेजा (फ्लाइंग बीस्ट), चिंकी मिंकी, कृष्णा श्रॉफ, अरशिफा खान, तनुश्री दत्ता, शरद मल्होत्रा, ममता कुलकर्णी, अपूर्व मुखिज आणि पूरव झा हे कलाकार सहभागी होऊ शकतात.

टॅग्स :बिग बॉससलमान खान