Join us  

VIDEO : कंगना रनौतच्या पोस्टरला चपला मारतानाचा व्हिडीओ पाहून भडकली शिल्पा शिंदे, म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 1:25 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनावर जोरदार टीका केली होती. कंगनाच्या या वादग्रस्त पोस्टनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला. ज्यात काही महिला कंगनाच्या पोस्टरला चप्पलांनी बडवताना दिसत आहेत. 

अभिनेत्री कंगना रनौतने काही दिवसांपूर्वीच मुंबईची तुलना पाकिव्याप्त काश्मीरसोबत केली होती. ज्यावरून बराच वाद पेटला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनावर जोरदार टीका केली होती. कंगनाच्या या वादग्रस्त पोस्टनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला. ज्यात काही महिला कंगनाच्या पोस्टरला चप्पलांनी बडवताना दिसत आहेत. 

या व्हिडीओवर टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने टीका केलीय. हा व्हिडीओ पाहून ती हैराण झाली असून असं करणं निंदनीय असल्याचं ती म्हणाली. शिल्पाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत लिहिले की, 'महिलाच महिलेची वैरी. या महिलांना किती पैसे मिळाले असतील या लाजिरवाण्या कामासाठी? घरात याच महिला पतींकडून मार खात असतील, त्याचं फ्रस्ट्रेशन या पोस्टरवर काढत आहे'.

कंगनाच्या वादग्रस्त विधानावर संताप

स्वत: कंगनाही तिच्या पोस्टरवर अशाप्रकारे चपला मारल्याने संतापली होती. कंगनाच्या पीओके विधानानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी अभिनेत्री विरोधात प्रदर्शन केलं होतं आणि तिच्या पोस्टरवर चपला मारल्या होत्या. याचा एक व्हिडीओ रिट्विट करत कंगनाने लिहिले होते की, 'सुशांत आणि साधूंच्या मर्डरनंतर आता प्रशासनाला माझ्या विचारामुळे माझ्या पोस्टरला चपलेने मारणं, असं वाटतं मुंबईला खूनाची सवय झालीय'.

कंगनाला माफी मागावीच लागेल - संजय राऊत

दरम्यान, राऊत विरुद्ध रनौत या चकमकीत आज कंगनाने टिष्ट्वटरवर व्हिडीओ टाकून संजय राऊत यांच्यावर टीका केली. राऊत यांनी टीका करताना कंगनाच्या बापाला इथे यावे लागेल, हरामखोर असे शब्द वापल्याचाही व्हिडीओ कंगनाने शेअर केला. ‘अशी भाषा आणि त्यामागील मानसिकतेमुळे महिलांवरील अत्याचार वाढीस लागतात. त्यामुळे या देशातील महिला तुम्हाला माफ करणार नाहीत. याआधी आमिर खान, नसरुद्दीन शहा यांनी असुरक्षित वाटत असल्याचे विधान केले तेव्हा कोणी बाप काढला नाही किंवा हरामखोर म्हटले नाही.

आता मात्र हे शब्द सुचत आहेत. मी केलेली टीका ही प्रशासनावर आहे, कारभारावर आहे. ती महाराष्ट्रावरील टीका होत नाही आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे. बाकी, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे, तेव्हा भेटूच,’ असे कंगनाने आपल्या व्हिडीओत म्हटले आहे.

कंगनाबद्दल वापरलेल्या भाषेबद्दल विचारले असता राऊत म्हणाले की, ‘मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल अभद्र भाषेचा उपयोग करणारा कुणीही असो, माफी मागावीच लागेल. आमच्यापैकी कुणी असेल तरीही त्याला मी माफी मागायला सांगेन. कंगनाने आधी माफी मागितली तर मी विचार करेन.’

हे पण वाचा:

अभिनेत्री कंगना राणौतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा

संजय जी, 9 सप्टेंबरला भेटूच; जय हिंद, जय महाराष्ट्र!; Video पोस्ट करून कंगनानं दिलं आव्हान 

कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु – शिवसेना खा. संजय राऊत

टॅग्स :शिल्पा शिंदेकंगना राणौतबॉलिवूडसंजय राऊत