Join us  

विकी जैनच्या एव्हिक्शनवर अंकिता आधी खूश, नंतर खोटं रडत मिळवली सहानुभूती; नेटकऱ्यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 11:06 AM

अंकिताच्या 'ड्रामा'वर नेटकरी बरसले

'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) चा ग्रँड फिनाले जसजसा जवळ येतोय प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. आयेशा खान आणि ईशा मालवीय दोघींच्या एलिमिनेशननंतर आता विकी जैनचाही प्रवास संपला. अंकिता लोखंडे, विकी जैन आणि अभिषेक कुमारही या तिघांमधून विकी जैन (Vicky Jain) एविक्ट होत असल्याचं बिग बॉसने जाहीर केलं. यानंतर अंकिताच्या चेहऱ्यावर आधी ती सुरक्षित असल्याचा आनंद होता. मात्र नंतर प्रेक्षकांसाठी आता खोटं खोटं रडावं लागेल म्हणत तिने नंतर घरात अश्रू ढाळले. अंकिताचं (Ankita Lokhande) हे नाटक पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर 'स्वार्थी अंकिता' म्हणत टीका केली आहे.

बिग बॉस 17 च्या कालच्या एपिसोडमध्ये अंकिता, मुन्नावर, अभिषेक आणि अरुण शेट्टी यांना एक्टिव्हिटी रुममध्ये बोलवलं जातं. तिथे एक सेटअप केलेला असतो. प्रत्येकाच्या नावाचा एक बॉक्स झाडावर लटकलेला असतो. प्रत्येक जण एक एक चिठ्ठी काढतो आणि बिग बॉसच्या आदेशावर ते उघडतो. यावर सर्वांच्या लिस्टवर फायनलिस्ट लिहिलेलं असतं. मात्र विकी जैनच्या चिठ्ठीवर 'एविक्टेड' लिहिलेलं असतं. हे कळताच अंकिताच्या चेहऱ्यावर आधी ती सुरक्षित असल्याचा आनंद दिसतो. विकी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि घराबाहेर पडतो. 

मात्र नंतर अंकिताच्या लक्षात येतं की आता आपल्याला खोटं का होईना रडावं लागेल. ती विकीला मिठी मारत ढसाढसा रडते आणि म्हणते, 'मला तुझी बायको असल्याचा अभिमान आहे.' तसंच ती विकीला जाता जाताही टॉन्ट मारते. 'बाहेर जाऊन पार्टी नको करु' असं ती त्याला म्हणते.

अंकिताचा हाच ड्रामा पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. 'पवित्र रिश्ता 3' सुरु झालं असल्याच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.'बिग बॉस 17'ची सर्वात नकली स्पर्धक अशीही कमेंट एकाने केली आहे. 

टॅग्स :अंकिता लोखंडेबिग बॉसटिव्ही कलाकारट्रोलसोशल मीडिया