Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 2: वीणा म्हणाली, घरातील या व्यक्तीसोबत मी कधी मैत्री करू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 16:05 IST

बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. 

बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. कारण, घरामध्ये आलेल्या पत्रकारांनी सहा फाईनलिस्टन अनेक बेधडक प्रश्न विचारले आहेत ज्याची त्यांनी सडेतोड उत्तरे देखील दिली आहेत. घरामधील सदस्य एकमेकांवर अनेक आरोप – प्रत्यारोप,अनेक बाबींचे जाब विचारत असतात पण आज मात्र त्यांना हे पत्रकार जाब विचारणार आहेत, त्यांना त्यांचे मुद्दे मांडण्याची संधी मिळणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वीणा आणि शिवानीचे काय नाते आहे हे आता सगळ्यांनाच माहिती आहे... या दोघींचे एकमेकींशी अजिबात पटत नाही. वीणाला या पत्रकार परिषदेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला की, या घरामधून बाहेर गेल्यावर कोणाशी मैत्री कायम ठेवायला आवडेल आणि कोणाचं तोंडसुध्दा बघायची इच्छा नाहीये ? यावर वीणाचे म्हणणे होते, “ज्यांना माझे तोंड बघायची इच्छा आहे त्यांनी या नक्की, आणि ज्यांना माझ तोंड बघायच नाही त्यांच तोंड बघायची मलाही इच्छा नाही”. आणि यावर शिवानीचे म्हणणे होते, “बरी दिसते वीणा... बघू शकते मी तीच तोंड... वीणाने त्यावर लगेच उत्तर दिले, “मी तिच्यासोबत मैत्री नाही करू शकत”. 

टॅग्स :बिग बॉस मराठीवीणा जगताप