Join us

जुई गडकरीच्या 'या' मालिकेने पूर्ण केले शंभर भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 06:30 IST

एक अत्यंत वेगळ्या प्रकारचे कथानक असल्याने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेले जुई, विकास आणि विजय यांनी आपल्या भूमिका योग्य प्रकारे निभावल्या आहेत

ठळक मुद्देमालिकेच्या या यशात या तिघा कलाकारांचा महत्वाचा वाटा आहे

'झी युवा' ही मराठीवरील 'वर्तुळ' मालिकेने नुकतेच शंभर भाग पूर्ण केले आहेत. एक अत्यंत वेगळ्या प्रकारचे कथानक असल्याने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेले जुई, विकास आणि विजय यांनी आपल्या भूमिका योग्य प्रकारे निभावल्या आहेत. मालिकेच्या या यशात या तिघा कलाकारांचा महत्वाचा वाटा आहे. परंतु कुठलीही मालिका यशस्वी होण्यामध्ये पडद्यामागच्या कलाकारांचाही मोलाचा वाटा असतो. त्यांची मेहनत दुर्लक्षित करून चालत नाही. म्हणूनच 'वर्तुळ' मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत असताना, सगळ्याच टीमला त्यात सहभागी करून घेण्यात आलं. मालिकेच्या संपूर्ण टीमने केक कापून हा आनंद आनंद साजरा केला. वर्तुळ ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ९ वाजता झी युवावर पाहायला मिळते.

मालिकेच्या या यशाबद्दल बोलताना, मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी म्हणते; "मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्याचा खूप आनंद आहे. कथानक वेगळ्या प्रकारचे असल्याने, सुरुवातीला मनात काहीशी धास्ती/भीती होती. पण, प्रेक्षकांना मालिका आवडते आहे. त्यांचे प्रेम असेच कायम राहील याची खात्री वाटते. मालिकेवर भरभरून प्रेम करत असलेल्या प्रेक्षकांचे मी विशेष आभार मानते. कोणत्याही मालिकेच्या यशात, पडद्यामागे असणाऱ्या कलाकारांचाही खूप मोठा वाटा असतो. त्यामुळेच मालिकेच्या यशात तेही सामान भागीदार असतात. म्हणूनच यश साजरं करत असतांना, त्यांनाही सहभागी करून घेणं फार गरजेचं होतं. केक कापण्यासाठी, संपूर्ण टीम उपस्थित असणं हा त्याचाच एक भाग होता."

टॅग्स :जुई गडकरीझी युवा