Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कबीर सिंग'मधील वनिता खरातचं काम पाहून भारावलेला शाहीद कपूर, म्हणालेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 12:50 IST

Vanita Kharat Birthday : "तुझ्याबरोबर काम करून...", 'कबीर सिंग'मध्ये वनिताचं काम पाहून अशी होती शाहीद कपूरची प्रतिक्रिया

उत्तम अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत नाव कमावणारी गुणी अभिनेत्री वनिता खरात.  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या वनिताचा आज वाढदिवस आहे. अनेक विविधांगी भूमिका साकारुन वनिताने तिच्या अभिनयाची छाप पाडली. वनिताने अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. मराठीबरोरच वनिताने हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. 'कबीर सिंग' या बॉलिवूड चित्रपटात वनिता झळकली होती. 

शाहीद कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत असलेल्या 'कबीर सिंग'मध्ये वनिताने मोलकरणीची भूमिका साकारली होती. अगदी थोडाच वेळ पडद्यावर दिसूनही वनिताने अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'कबीर सिंग'मधील वनिताच्या भूमिकेचं कौतुक करण्यात आलं होतं. या चित्रपटात तिने शाहीद कपूरबरोबरही स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातील वनिताचं काम पाहून शाहीद कपूरही भारावून गेला होती. एका मुलाखतीत वनिताने याबद्दल भाष्य केलं होतं. 

Video : अमेरिकेतील लक्झरियस हॉटेलमध्ये थांबले आहेत हास्यजत्रेचे कलाकार, समीर चौघुलेंनी दाखवली झलक

"शाहीद कपूर सुरुवातीला मला येऊन भेटला, माझ्याशी बोलला. पण, त्याच्याबरोबर पहिला सीन केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया खूपच वेगळी होती. सीन शूट झाल्यानंतर तो भारावून गेला होता. तू खूप चांगलं काम करते. तुझ्याबरोबर काम करताना मला मज्जा आली, असं तो मला म्हणाला.चित्रपटानंतर मी शाहीद कपूरबरोबर एका अवॉर्ड शोमध्येही काम केलं. त्यावेळीही तो तेवढ्याच आपुलकीने येऊन मला भेटला होता,” असं वनिताने सांगितलं होतं. 

सध्या वनिता महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमबरोबर अमेरिका दौऱ्यावर आहे. वनिताने २ फेब्रुवारीला सुमित लोंढेबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. वनिताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. 

टॅग्स :वनिता खरातमहाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेताशाहिद कपूर